भोकर :(रमेश गंगासगरे )  येथील शिवसेनेचे जुने धडाडीचे ज्येष्ठ कार्यकर्ते ॲड. परमेश्वर पांचाळ यांची नुकतीच भोकर व  हदगाव विधानसभेसाठी समन्वयक पदी नुकतीच निवड करण्यात आली असल्याने त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.

       परमेश्वर पांचाळ हे मागील अनेक वर्षापासून शिवसेनेशी एकनिष्ठ राहिल्याचे पाहून नांदेड जिल्हा संपर्कप्रमुख श्री, आनंदराव जाधव यांनी त्यांना समन्वयक पद मिळावे म्हणून उद्धव ठाकरे यांच्याकडे शिफारस केली होती, त्या अनुषंगाने त्यांची परवाच निवड झाली असल्याचे दैनिक सामना मधून प्रसिद्ध करण्यात आले आहे, त्यामुळे परमेश्वर पांचाळ यांच्यावर नागनाथ घिसेवाड, माधव बिलेवाड, सुभाष नाईक, संतोष पवार, संतोष कोटुरवाऱ, स्वप्नील रेड्डी, राजु कवडे, दत्ता बोईनवाड, बालाजी एलप्पे, माधवराव शिंदे, पप्पू जाकापूरकर, बालाजीराव खर्डे, पत्रकार रमेश गंगासागरे, पत्रकार बालाजी नारलेवाड, पत्रकार जय-भीम पाटील, ऍड.  लोखंडे, ऍड कुलकर्णी,  ॲड सिद्धार्थ कदम, ऍड खाडे,  ॲड. शेख सलीम, भगवान जाधव, गणेश आरवाड,  विलास मुगटकर, संजय दरबस्तवार, डॉक्टर संजय पवार,  संतोष पूलेवार, गजानन पोटेकर, सतीश देशमुख, सत्यनारायण जोगळेकर, कुलदीप जोशी, नरेश दंडवते, भगवान जाधव, कमलाकर बरकमकर, राजु रेड्डी लोकावाड,  राजाबाबू शिंकोजिकर, माधवराव अमृतवाड,  नारायणराव पांचाळ,  नामदेवराव पांचाळ, शिवानंद पांचाळ,  सचिन इंगोले, संतोष चंचलवार, यांच्यासह अनेक मित्रपरिवार वकील डॉक्टर पत्रकार तसेच विश्वकर्मा समाजातर्फे त्यांचे मोठ्या प्रमाणावर अभिनंदन होत आहे.