भोकर :(रमेश गंगासगरे ) अण्णाभाऊ साठे यांनी बहुजनाची आर्थिक आणि सामाजिक बाजू आपल्या साहित्यातून मांडली आहे. ज्या गोष्टी इतर साहित्यात मांडल्या गेल्या नाहीत त्याची सुरूवात अण्णाभाऊ साठे यांनी केली. दलित साहित्याचा अभ्यास करतांना दलितांचे प्रश्न, त्यांची कारणे, आणि उपाय यावर विचार करणे आवश्यक आहे. जाती, धार्मिक भेदभावावर लक्ष देऊ नका, आर्थिक सक्षमतेचा विचार करा. सध्या वाचन मागे पडले असून आपण सगळे क्रिकेटच्या रणा मागे धावत आहोत. या क्रीकेटने आपले विचार संपविले. फेसबूकपेक्षा आपण फेस टू फेस आले पाहिजे. सामाजिक प्रश्नांकडे आपण संवेदनशीलपणे पाहिले पाहिजे, असे परखड मत प्राध्यापक सुषमाताई अंधारे यांनी भोकर येथील साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे सार्वजनीक जयंतीत व्याख्यान करताना विचार मांडले ते प्रमुख वक्ते म्हणून बोलत होत्या.
       पुढे बोलतांना प्रा.आंधारे म्हणाल्या की,  भारतात  सुरू झालेली साहित्याची चळवळ देशव्यापी झाली असून, ही खूप समाधानाची बाब आहे. साहित्यरत्न अण्णाभाऊ साठे यांचे साहित्याने खर्‍या अर्थाने अन्यायाला वाट मोकळी करून दिली, एक नवा चेहरा दिला. अण्णाभाऊ साठे यांनीही डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांवर आपले साहित्य निर्माण केले, म्हणून अण्णाभाऊंच्या साहित्याकडे  दुर्लक्ष करून चालणार नाही असे त्या म्हणाल्या, अण्णाभाऊंनी जग बदल घालुनी घाव सांगून गेले मज भीमराव, या विचारातून जाती जाती मधील दरी कमी करण्यासाठी प्रयत्न केला पाहीजे, आंबेडकरवाद यांचा समन्वय त्यांनी समजावून सांगितला. अण्णाभाऊ साठेंचे विचार कायम पोहचवला पाहिजे अशी अपेक्षा त्यांनी शेवटी व्यक्त केली. या नंतर अण्णाभाऊ साठे पिपल्स फोर्स चे संस्थापक अध्यक्ष वाघमारे यांनी अध्यक्षीय समारोप केला, दुसऱ्या सत्रात सांस्कृतीक कार्यक्रमात शाहीर रविराज भद्रे व गायीका ललीता शिरसाठ यांनी गिताच्या माध्यमातुन समाज प्रबोधन केले, व शेवटी ४ वाजता साहीत्यरत्न अण्णाभाऊ साठे यांच्या तैलचित्राची भव्य मिरणुक काढण्यात आली, आणि शेवटी डॉ आंबेडकर चौकात समारोप करण्यात आला. या वेळी सूत्रसंचलन सखाराम वाघमारे यांनी केले. आभार सांभाळकर सुनील यांनी मानले, जंयती यशस्वीतेसाठी दिलीप वाघमारे, विजय इंगळे, संतोष सुर्यवंशी, शिवकुमार गाडेकर, दत्ता मोतेकर, सुनील देवाले , यशोदाबाई शेळके, पुजा बनसोडे, अश्वीनी निळकंटे , चंद्रकलाबाई अस्वलमारे , आदिनी परिश्रम घेतले या वेळी असंख्य समाज बांधव उपस्थीत होते.