भोकर :(रमेश गंगासागरे ) भोकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी श्री नितीन बागुल यांची नुकतीच बदली झाल्यामुळे त्यांच्या ठिकाणी उमरीचे मुख्याधिकारी श्री काकासाहेब डोईफोडे यांनी तात्पुरता पदभार स्वीकारला आहे.
भोकर नगर परिषदेचे मुख्याधिकारी नितीन बागुल यांचा भोकर येथे कार्यकाल पूर्ण होण्याच्या आधीच त्यांची किल्ले धारूर येथे बदली झाली आहे. त्यामुळे मागील आठवड्यात रिक्त झालेल्या जागेवर 19 ऑगस्ट रोजी उमरीचे मुख्याधिकारी श्री, काकासाहेब डोईफोडे यांच्याकडे भोकर नगरपरिषदेचा तात्पुरत्या स्वरूपाचा पदभार देण्यात आला आहे. भोकर मध्ये पाण्याचा प्रश्न सध्या गंभीर स्वरूपाचा होत चालला असून आठ दिवसाला नळाला पाणी येत आहे, यासह फेरफार, स्वच्छता, मोकाट जनावरे व डासांचा बंदोबस्त यासह नागरिकांचे विविध प्रलंबित कामे असल्यामुळे भोकर नगर परिषदेला कायमस्वरूपी मुख्याधिकारी देण्यात यावा अशी मागणी भोकर शहरात होत आहेत.

0 Comments