भोकर :(रमेश गंगासागरे ) दरवर्षीप्रमाणे याहीवर्षी भोकर येथील सेवालाल गड देवस्थानावर विविध सांस्कृतिक कार्यक्रम राबविण्यात येऊन तीज महोत्सव साजरा करण्यात आला.
गडावर 15 ऑगस्ट ते 23 ऑगस्ट असे 9 दिवस धार्मिक, सामाजिक, सांस्कृतिक यासह गडावर 300 झाडे लावण्यात आली, दिनांक 23 ऑगस्ट रोजी शहरातून महोत्सवाची मिरवणूक ढोल ताशाच्या गजरात काढण्यात आली, यामध्ये महिला व युवकांनी पारंपारिक वेशभूषा धारण केली होती, ही मिरवणूक शहराच्या मुख्य रस्त्याने येऊन शिवाजी महोत्सवाचे विसर्जन तहसिलदार भरत सूर्यवंशी यांच्या हस्ते करण्यात आले, यावेळी गडाचे मुख्य पुजारी श्री, लच्छीराम महाराज, भोकर पंचायत समितीचे सभापती गुलाब चव्हाण, डॉ. जाधव, डॉ. राठोड, डॉ. चव्हाण, सामाजिक कार्यकर्ते अप्पाराव राठोड, विशाल जाधव, मिलन जाधव, भूषण राठोड, राजू राठोड, अनिल राठोड, तसेच बंजारा तिचे आयोजक तथा सेवालाल गडाचे व्यवस्थापक बाळू महाराज यांच्यासह भोकर व भोकर तालुक्यातील असंख्य बंजारा बांधव या महोत्सवामध्ये सामील झाले होते.


0 Comments