भोकर :-(रमेश गंगासागरे ) कोल्हापूर जिल्ह्यात सगळीकडे पुराने थैमान माजवले असून या पुराच्या पाण्यात अनेक नागरिकांचे संसार वाहून गेल्याने अनेक जणांची राहण्याची  व खाण्यापिण्याची वाताहात होत आहे हे पाहून भोकर तेथील नागरिकांनी दिलेली मदत घेऊन सावली प्रतिष्ठानच्या वतीने आज एक गाडी कोल्हापूर कडे रवाना करण्यात आली आहे.

       पूरग्रस्तांना भोकर वासियां तर्फे काहीतरी मदत मिळावी म्हणून भोकर येथील सावली प्रतिष्ठानचे संस्थापक डॉक्टर विजयकुमार दंडे यांच्या नेतृत्वाखाली अनेक सामाजिक कार्यकर्ते एकत्र येऊन भोकर शहरात मागील दोन दिवसापासून मदत फेरीसाठी फिरत होते, या कार्यकर्त्यांना भोकर येथील असंख्य नागरिकांनी सढळहस्ते मदत देऊन माणुसकीचे दर्शन घडविले आहे, या देण्यात आलेल्या मदतीमध्ये गहू, तांदूळ, साखर, तेल, मिरची, हळद, कपडे, व शालेय साहित्य आदी स्वरूपाची मदत समाविष्ट आहे, ही सर्व मदत एका मोठ्या आयशर टेम्पो क्रमांक एम. एच.  16 क्यू 73 25 मध्ये एकत्र करून आज संध्याकाळी साडेपाच वाजण्याच्या दरम्यान रवाना करण्यात आली आहे, यावेळी भोकर पंचायत समितीचे उपसभापती सूर्यकांत बिलेवाड, नगरसेविका विजयाताई घुमलवाड, श्री घुमलवाड सर, पत्रकार बाबुराव पाटील, पत्रकार रमेश गंगासागरे, पत्रकार राजेश वाघमारे, पत्रकार शंकर कदम, पत्रकार भीमराव दुधारे, पत्रकार दशरथ भदरगे, दत्ता भाऊ डोंगरे, सुनील भाऊ कांबळे, रज्जाक सेठ प्रेसवाले, डॉक्टर एकाळे, डॉक्टर श्रद्धा बेलगमवार, डॉक्टर गीता नारलावार, यांच्यासह मधुकर गोवंदे, सुरज अर्पिले, चेतन कोटूरवार, स्वप्नील रेड्डी, केतन के.पी, अमोल मारुडवार, महेश नारलावर, सचिन कमटलवार, शेख शब्बीर भाई, गंगाधर कल्याणकर, बंटी लोखंडे यांच्यासह असंख्य सामाजिक कार्यकर्त्यांनी मेहनत घेतली होती. व आज या सर्वांची उपस्थिती लाभली होती.