भोकर:-(रमेश गंगासागरे ) मा.आ. बापुसाहेब गोरठेकर यांना आज दिनांक 16 ऑगस्ट रोजी शासकीय विश्रामगृह भोकर येथे भाजपा तालुका शाखा भोकर व ग्रामीण कार्यकर्त्यांनी वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.
बापूसाहेब गोरठेकर यांनी मागील महिन्यात नांदेड येथे आपले असंख्य कार्यकर्ते व हितचिंतकासह एका भव्य कार्यक्रमात राष्ट्रवादीला सोडचिठ्ठी दिल्यानंतर ते भाजपमध्ये जाणार असल्याच्या चर्चेला उधाण आले आहे. भाजप मध्ये प्रवेश करून त्यांना भोकर विधानसभेतून उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चेने काही दिवसांपूर्वीच भोकरच्या 'ना'राज कार्यकर्त्यांनी आपला रोष व्यक्त केल्याने, भोकर भाजपमध्ये खळबळ उडाली होती, चार दिवसांपूर्वी येथील भाजपच्या कार्यकर्त्यांनी ओम लॉन्स मंगल कार्यालय येथे एका बैठकीत बाहेरचा उमेदवार चालणार नसल्याच्या प्रतिक्रिया दिल्या होत्या, असे असतानाच आज दि,16 ऑगस्ट रोजी दुपारी बापूसाहेब गोरठेकर हे भोकरला येऊन जुन्या निष्ठावंत कार्यकर्त्यांच्या भेटी घेत असतानाच शासकीय विश्रामगृह भोकर येथे त्यांना आमंत्रित करण्यात येऊन भोकर भाजपकडून वाढदिवसाच्या व भावी शुभ कार्याच्या मोठ्या प्रमाणात शुभेच्छा देण्यात आल्याने राजकीय वर्तुळात पुन्हा "नव्या चवीने" चर्चा होत आहे. यावेळी भाजपचे ज्येष्ठ कार्यकर्ते किशोर पाटील लगळुदकर, तालुकाध्यक्ष गणपत पिटेवाड, भाजपचे नगरसेवक संतोष मारकवार, बाळा साखळकर, नंदू ऱ्याकावार, बालाजी वाघमारे, शेख अर्षद भाई, जवाजोदिन बरबडेकर, माधव पाटील बटाळकर, प्रकाश भाऊ कोंडलवार, हरिभाऊ चटलेवाड, माऊली पाटील चिंचाळकर, यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.

0 Comments