भोकर:-(रमेश गंगासागरे ) साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांच्या 99 व्या जयंती मंडळाचे अध्यक्ष म्हणून भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते दिलीप वाघमारे यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे.
 |
| जयंती मंडळाचे अध्यक्ष दिलीप वाघमारे |
दिलीप वाघमारे हे जयंती मंडळाचे अध्यक्ष घोषित होताच त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे भोकर येथील साहित्यसम्राट अण्णाभाऊ साठे यांची जयंती रविवार दिनांक 25 ऑगस्ट रोजी होणार असल्याचे नवनिर्वाचित अध्यक्ष दिलीप वाघमारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे 25 ऑगस्ट रोजी सकाळी मान्यवरांच्या हस्ते विविध ठिकाणी ध्वजारोहन आयोजित केले असून त्याच दिवशी सकाळी शाहीर रविराज भद्रे आणि सौ ललिता शिरसाट यांच्या गायनाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला आहे, तद्नंतर महाराष्ट्रातील प्रसिद्ध व्याख्याते सुषमाताई अंधारे यांचे व्याख्यान आयोजित करण्यात आले असून समाजबांधवांनी व नागरिकांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे. उर्वरित जयंती मंडळाची कार्यकारिणी अशी,
उपाध्यक्ष विजय इंगळे, सचिव सखाराम वाघमारे, सहसचिव संतोष सुर्यवंशी, कोषाध्यक्ष शिवकुमार गाडेकर, संघटक दत्ता भुतेकर, सहसंघटक सुनील देवाले अशी आहे.
0 Comments