भोकर:-(रमेश गंगासागरे) चिदगिरी तालुका भोकर येथील मूळ रहिवाशी तथा भोकर तालुक्याचे भूमिपुत्र ज्येष्ठ पोलिस निरीक्षक श्री,बालाजीराव सोनटक्के यांना यावर्षीचा राष्ट्रपती पुरस्कार नुकताच जाहीर झाल्याने त्यांचे सर्व स्थरातून अभिनंदन होत आहे.
       
       चिदगिरी ता.भोकर येथे अत्यंत प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिल्हा परिषदेच्या शाळेत प्राथमिक शिक्षण घेऊन पुढील शिक्षण नांदेड येथे त्यांनी पूर्ण केले होते, देशसेवा करण्याची, वाचनाची व अभ्यासाची आवड असल्याने त्यांनी शासकीय सेवेत भरती होऊन देशसेवा करण्याचे स्वप्न उराशी बाळगले होते, अथक परिश्रमानंतर त्यांनी पहिल्याच प्रयत्नात भारतीय लोकसेवा आयोगाची परीक्षा पास झाले, प्रशिक्षणानंतर  त्यांची सन 1991 रोजी पोलीस निरीक्षक म्हणून निवड झाली, तेव्हा त्यांना पहिली जॉइनिंग म्हणून औरंगाबाद येथिल एम.आय.डी. सी. पोलिस ठाण्यात नियुक्ती मिळाली, तेव्हापासून त्यांनी आपल्या कार्याचा ठसा उमटवत अनेक गुन्हेगारांना सळो की पळो करून सोडले होते, यासोबतच त्यांनी औरंगाबाद, लातूर, पुणे येथे अनेक उत्तम कामगिऱ्या केल्या होत्या, त्यांच्या या कार्याची पावती म्हणून महाराष्ट्र शासनाने त्यांना राष्ट्रपती पदक मिळण्यासंदर्भात केंद्राकडे शिफारस केली होती, त्या अनुषंगाने त्यांना स्वातंत्र्यदिनी राष्ट्रपती श्री, रामनाथ कोविंद यांच्या हस्ते पदक बहाल करण्यात येणार आहे, पोलीस निरीक्षक श्री सोनटक्के साहेबांना राष्ट्रपती पदक मिळणार असल्याची वार्ता सोशल मीडिया वरून भोकर तालुक्यात पसरताच संपूर्ण तालुक्यात व चिदगिरी येथील गावकऱ्यांत आनंदाचे वातावरण पसरले असून त्यांच्यावर सर्व स्थरातून अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.
कर्तव्यदक्ष ज्येष्ठ पोलीस निरीक्षक श्री, सोनटक्के