पुणे :-(रमेश गंगासागरे ) पुणे येथे पार पडलेल्या एका शानदार सोहळ्यात सत्यमेव जयते वॉटर कप स्पर्धेचा यावर्षीचा निकाल नुकताच घोषित झाला असून त्यामध्ये भोकर तालुक्यातील कोळगाव प्रथम, द्वितीय पांडुरना तर तृतीय रेनापुर गाव निवडल्या गेल्याने त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
आज दिनांक 11 ऑगस्ट 2019 रोजी पुणे येथील बालेवाडी भागातील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा संकुल येथे दुपारी एका भव्य दिव्य कार्यक्रमात निकालाची घोषणा करण्यात आली, यात भोकर तालुक्याला अनुक्रमे प्रथम, द्वितीय आणि तृतीय क्रमांक मिळाले आहेत. पाणी फाउंडेशनने भोकर तालुक्यातील जवळपास 40 खेड्यांमध्ये वाटर कप स्पर्धा आयोजित केली होती, यामध्ये सर्व गावकऱ्यांनी हिरीरीने सहभाग घेऊन पाणी बचत करण्यासाठी श्रमदान केले होते, यात कोळगाव येथील गावकऱ्यांनी सर्वाधिक प्रमाणात सहभाग घेऊन तालुक्यात सर्वात जास्त प्रमाणात कामे केली असल्याने त्यांचा आज प्रथम क्रमांक आला आहे, तर पांडुरना येथील गावकऱ्यांनी सुद्धा मोठ्या प्रमाणात श्रमदान केले त्यांचा दुसरा क्रमांक आला आहे, रेनापुर येथीलही गावकऱ्यांनी श्रमदान केले असल्याने त्यांचासुद्धा तिसरा क्रमांक आला आहे. पाणी बचतीचा ध्यास घेतलेल्या पाणी फाउंडेशन ने भोकर तालुक्यात एक प्रकारे हरितक्रांती केली असून नागरिकांना पाणी बचतीचे श्रमदानातून धडे दिले आहेत, त्यामुळे आज भोकर तालुका हिरवाईने नटलेला दिसून येत आहे, पांडुरना येथे1 मे 2019 रोजी महाश्रमदान कार्यक्रमांमध्ये अनेक सामाजिक व राजकीय संघटनांनी सहभाग नोंदवला असून यामध्ये पत्रकारांनीही सुद्धा मोलाचे श्रमदान केले आहे, तर कोळगाव येथे, सेवा प्रतिष्ठान, भोकर विचार विकास मंच, सावली प्रतिष्ठान, शिक्षक संघटना, डॉक्टर असोसिएशन, तसेच भोकर तालुका मेडिकल असोसिएशन तर्फे मोठ्या प्रमाणावर दररोज श्रमदान करण्यात आले होते, या सर्वांच्या मेहनतीचे फळ म्हणून आज कोळगावला प्रथम क्रमांक मिळाल्याचा आनंद सर्वांच्या चेहर्यावरून ओसंडून वाहतांना दिसून येत आहे.

0 Comments