भोकर :- (रमेश गंगासागरे )  येथील शिवाजी चौकातील एका क्लासेसच्या हॉलमध्ये आशा वर्कर्स, गट प्रवर्तक यांचा मेळावा आज दि १० ऑगस्ट २०१९ रोजी दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास कॉ. उज्वला पडलवार यांच्या अध्यक्षतेखाली आयोजित करन्यात आला होता.
        या बैठकीमध्ये आशा वर्कर्स  व गटप्रवर्तक महिलांमध्ये   अनेक वर्षांपासून प्रलंबित असलेल्या विविध मागण्या बाबत चर्चा घडवून आणण्यात आली, चर्चेअंती शेवटी CITU (सिटू) संलग्न महाराष्ट्र आशा वर्कर्स, गट प्रवर्तक संघटना शाखा भोकरची नुतन कार्यकारणी निवडण्यात आली. जयश्री इंगळे (अध्यक्ष), रेणूका देशमुख (सचिव), सहसचिव अनिता जंपलवाड, निर्मला गायकवाड , सुवर्णा अकमवार, आहिल्या चुकमवाड आदि लोकांची कार्यकारणी सर्वानू मते निवडण्यात आली. यावेळी कॉ. दिलीप पोतरे, शिवाजी गायकवाड, धोंडगिर गिरी, संजय जळपतराव, अनिल कराळे आदि सिटूचे पदाधिकरी उपस्थित होते. दिलीप पोतरे, शिवाजी गायकवाड यांनी आशा वर्कर्सना मार्गदर्शन केले . शेवटी कॉ. उज्वला पडलवार यांनी अध्यक्षीय समारोप केला. त्यानंतर उपस्थित आशा वर्कर्स गट प्रवर्तक यांचे शिष्टमंडळ यांनी आपल्या विविध मागण्यांचे निवेदन भोकर तहसिलदार यांना दिले .