हदगाव:-(भगवान शेळके )
         युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे यांचे हदगाव शहरातील दत्‍तबडीऀ देवस्थान या ठिकाणी आगमन होताच ढोलताशाच्‍या गजरात वाजतगाजत त्‍यांचे स्वागत आमदार नागेश पाटील आष्‍टीकर व युवासेना नांदेड जिल्‍हाधीकारी कृष्‍णा पाटील आष्‍टीकर यांच्‍याकडुन करण्यात आले. या ठिकाणी आल्‍यानंतर त्यांनी सवऀ प्रथम दत्‍तात्रयाचे दशऀन घेतले, संस्‍थानच्‍या वतीने मंहत गोपाळगीर महाराज यांनी त्‍यांचे स्‍वागत केले.
     . यावेळी उपस्थित शेतकऱ्यांनी पीक विमा, उत्पादन खर्चावर शेतमालाला हमीभाव, रात्रीचे लोड सेटिंग बंद करा,  रोजगाराचे प्रश्न कायमस्वरूपी निकाली काढा, महाराष्ट्राला संपूर्ण कर्जमुक्ती आणि वीज बिल माफी, गंगा नदीवरील बंधारा चा प्रश्न आणि उन्हाळ्यात ईसापुर धरणाचे पाणी पात्रात सोडण्याबाबत प्रशासनाची आडकाठी हे प्रश्नही मार्गी लावावेत यावर शेतकऱ्यांनी पोट तिडकेने प्रश्न विचारले, तोट्यात चाललेली शेती आणि त्यामुळे वाढत असलेली कर्ज यामुळे हैराण झालेला शेतकऱ्यांना शिवसेनाच न्याय देऊ शकते यावर कायमचा तोडगा काढा अशी मागणी उपस्थित शेतकऱ्यांनी केली व तसेच बचत गटाच्या माध्यमातून महिलांना येणाऱ्या अडचणी यावेळी महिलांनी मांडल्या बँके समोर उभ्या असलेल्या महिलांना रांगेत ताटकळत उभे राहावे लागते त्याचे हे प्रश्न मार्गी लागले पाहिजे, मराठवाडा आणि विदर्भ वेगवेगळ्या ठिकाणी लोड शेडिंग वेळापत्रक आहे, त्यात मराठवाड्यावर अन्याय का असाही सवाल शेतकऱ्यांनी केला, आदित्य ठाकरे यांनी त्या वेळी शेतकऱ्यांना असे सांगितले आपल्या सर्वांचे प्रश्न मी नोंदवून घेतले आहेत आहेत या प्रश्नावर तातडीने निर्णय घेतला जाईल ते आपण घेऊ मात्र धोरणात्मक निर्णय घेताना आपले सरकार आल्यानंतर यावर निश्चित निर्णय घेऊ, असा विश्वास त्यांनी व्यक्त केला पहिल्यांदाच मराठवाड्यात शेतकऱ्यांची त्यांनी संवाद साधल्याने या कार्यक्रमात बोलक्या प्रतिक्रिया आणि शेतकऱ्यांचे प्रश्‍न पोटतिडकीने मांडण्यात आले आणि त्यावर युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांनी गांभीर्याने विचार करून प्रत्येक प्रश्न मी महत्त्वाचा मानतो असे मत व्यक्त केले
संग्रहित छायाचित्र
       मराठवाड्यात आज प्रथमच शेतकरी बांधवांशी संवाद हा कार्यक्रम असल्याचे त्यांनी यावेळी म्हटले आहे, खाली बसलेल्या शेतकऱ्यांसोबत स्वतः खाली बसून आदित्य ठाकरे यांनी संवादाला सुरुवात केली, आदित्य ठाकरे म्हणाले की, आदित्य संवाद म्हणून यापूर्वी विद्यालयात शिक्षण तरुण बेरोजगारीवर बोललो सरकार म्हणून कर्जमुक्ती पिक विमा या विषयावर कोणी बोलायला आले आहे का ? असा प्रश्न आदित्य ठाकरे यांनी उपस्थित केला, शेतकर्या सोबत संवाद साधायला निवडणूक झाली की कोणी येत नाही मात्र शिवसेना कायम शेतकर्या सोबत उभी आहे

 ऊपस्‍थीत शेतकर्‍यांशी संवाद साधत त्‍यांच्‍या समस्‍या जानुन घेतल्‍या यावेळी बोलताना युवासेनाप्रमुख आदीत्‍य ठाकरे यांनी ज्‍या दीवशी शिवसेनेचा मुख्‍यमंञी होईल त्‍या दीवशी लगेच शेतकरी कजऀमुक्‍त करेन असे ऊद्‍गगार काढलेत, सत्‍तेत असुनही शिवसेनाच शेतकर्‍यासाठी अवाज ऊठवत आहे सतेत असो अथवा नसो शिवसेना नेहमी बळीराज्‍याच्‍या सोबत आहे. जन आशीर्वाद यात्रा ही मत मागण्यासाठी, रजकारणासाठी, किंवा सरकार बनवण्यासाठी नाहीय केवळ तुमचा आशीर्वाद घेण्यासाठी आहे, आदित्य संवाद शेतकरी हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता, युवासेनाप्रमुख नेहमी युवकांशी संवाद कार्यक्रम घेतात मात्र
  यावेळी  नांदेडचे पालकमंञी रामदास कदम, राज्‍यमंत्री अजुऀन खोतकर, खासदार हेंमत पाटील हिंगोली लोकसभा मतदार संग माजी खासदार चंद्रकांत खैरे ,आमदार नागेश पाटील आष्टीकर ,आमदार सुभाष साबणे, युवासेना जिल्‍हाधीकारी कृष्‍णा पाटीलआष्‍टीकर सह मोठया प्रमाणात        शेतकरी , महीला ,शिवसैनीक ,युवासेनीक कायऀकतऀ पदाधीकारी ऊपस्‍थीत होते.