भोकर :(रमेश गंगासगरे ) भोकर मध्ये अनेक व्यावसायिक राजरोसपणे घरगुती गॅसचा वापर आपल्या व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर करत असल्याचे आढळून आल्या वरून त्यांच्याविरोधात कलम 3 ,7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत पोलीस स्टेशन भोकर ने केलेल्या कारवाईत कोर्टाने सातही जणांना दोषी ठरविले असून त्यांना जबर शिक्षा व दंड लावल्याने घरगुती गॅसचा वापर करणाऱ्या व्यावसायिकांचे धाबे दणाणले आहेत.
       भोकर व भोकर तालुक्यात घरगुती गॅसचा वापर व्यवसायासाठी मोठ्या प्रमाणावर व्यावसायिक करत असल्याची गुप्त माहिती तहसीलदार व पोलीस प्रशासनाला मिळताच त्यांनी भोकर शहरात व तालुक्यात टाकलेल्या वेगवेगळ्या धाडी मध्ये सात व्यवसायिक अवैधरित्या आपल्या दुकानांमध्ये घरगुती गॅसचा वापर व्यवसायासाठी करत असल्याचे आढळून आले यात आरोपी नामे पत्तारेड्डी कोरटवाड, जळबाजी खूपसे, चंदन सिंग शेखावत, सुरेश नंदीलाल सेठ, शेख अजहर शेख अहमद, नारायण घिसेवाड, जियाउद्दीन इनामदार, यांच्याविरोधात भोकर पोलिसांनी तहसीलदार यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कलम 3,7 जीवनावश्यक वस्तू अधिनियम 1955 अंतर्गत प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी भोकर क्रमांक 2 यांच्याकडे दोषारोपपत्र सादर केले, यामध्ये प्रथमवर्ग न्यायदंडाधिकाऱ्यांनी दिनांक 22 ऑगस्ट 2019 रोजी सातही आरोपींना दोषी ठरवून त्यांना साधी शिक्षा व दंड ठोठावला आहे, यात क्रमांक 1 च्या आरोपीला एक वर्षाची साधी कैद व रुपये 3000 चा दंड ठोठावण्यात आला, तर उर्वरित सहाही आरोपींना एक महिन्याची साधी कैद व प्रत्येकी 2 हजार रुपये दंड ठोठावण्यात आला, वरील सातही प्रकरणात सरकार पक्षातर्फे विशेष सहाय्यक सरकारी अभियोक्ता श्री आशिष देशपांडे यांनी काम पाहिले व पैरवी अधिकारी म्हणुन पो.हे का. शेषराव चव्हाण व फिरोज खान पठाण यांनी मदत केली.