भोकर :-(रमेश गंगासागरे ) घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 17 एप्रिल 2016 रोजी भोकर येथील एक पंधरा वर्षाची अल्पवयीन मुलगी मुदखेड येथील केंद्रीय विद्यालया मध्ये शिक्षणासाठी ये - जा करत होती, या मुलीवर भोकर येथील आरोपी नामे अमोल अशोक कदम हा वाईट नजर ठेवून होता, दिनांक 17 एप्रिल 2016 रोजी त्याने मुदखेड येथे अल्पवयीन मुलीस गाठून माझ्या गाडीवर बस आपण भोकरला जाउया असे म्हणून जोर जबरदस्ती करू लागला, त्या मुलीने विरोध करताच तिच्या हातातील मोबाईल आरोपी अमोल कदम ने घेऊन फोडून टाकला, सदरील घटना भोकर येथे आल्यावर पीडित मुलीने आपल्या आईवडिलांना सांगितली, त्यानंतर त्याच दिवशी संध्याकाळी आरोपीने भोकर येथे सुद्धा अल्पवयीन मुलीचा विनयभंग केला, त्यावरून पीडित मुलीने भोकर पोलीस स्टेशन येथे दिलेल्या तक्रारीवरून आरोपी अमोल कदम यांच्याविरोधात बाललैंगिक प्रतिबंधक कायद्यानुसार गुन्हा दाखल करून आरोपीला अटक करण्यात आली होती, भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात या घटनेचा आज दिनांक 17 ऑगस्ट 2019 रोजी निकाल लागला असून न्यायालयाने आरोपीस तीन वर्ष सक्तमजुरी आणि पाच हजार रुपये दंडाची शिक्षा सुनावली आहे, सरकारी पक्षाची बाजू श्री, रमेश राजूरकर यांनी मांडली तर आरोपीचा बचाव ॲडव्होकेट आयचीत यांनी केला होता.

0 Comments