भोकर :- (रमेश गंगासागरे ) भोकर ते म्हैसा जाणाऱ्या राज्य रस्त्यावरील रहाटी गावाजवळ  दिनांक 25 जुलै च्या रात्री भोकरहुन म्हैसाकडे अवैधरित्या बैल घेऊन जाणाऱ्या एका आयशर टेम्पोस भोकर पोलिसांनी पकडून चालकाविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
     
फाईल चित्र
       
       याबाबत भोकर पोलिसांकडून मिळालेली माहिती अशी की, दिनांक 25 जुलै च्या रात्री अंदाजे  8 ते 9 च्या दरम्यान भोकर पासून पूर्वेस असणाऱ्या राहटी या गावाजवळ एक आयशर टेम्पो क्रमांक MH -26 H 8086 ज्यामध्ये मोठे पूर्ण वाढ झालेले  पांढऱ्या रंगाचे 6 बैल आढळून आले, त्या बैलाची बाजारात किंमत 1 लाख 20 हजार रुपये असल्याचे कळते, पोलिसांनी सदरील आयशर टेम्पो जप्त केला असून या टेम्पोची किंमत 3 लक्ष 50 हजार रुपये असल्याचे पोलिसांनी सांगितले आहे, सदरील टेम्पो चालक सुदर्शन गौतम कसबे राहणार समतानगर भोकर त्यांच्याविरुद्ध पोलीस नाईक माधव राजाराम पाटील यांनी दिलेल्या फिर्यादीवरून गुन्हा दाखल करण्यात आला असून, त्यांच्यावर प्राणी संरक्षण कायद्याअंतर्गत गु. र. न. 223/19 क.11(घ),(s) (च) नुसार कार्यवाही केली आहे.
       सदरील गुन्ह्याचा तपास पोलिस निरीक्षक विकास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली चालू आहे.