रमेश गंगासागरे:- भोकर पासून 25 किलोमीटर अंतरावर असलेल्या पाळज येथील श्रीगणेश मंदिरास तिर्थक्षेत्राचा दर्जा जिल्हा नियोजन मंडळाच्या दि,6 जुलै रोजी झालेल्या बैठकीत पालकमंत्री रामदास कदम आणि  खा.प्रताप पाटील चिखलीकर यांनी मिळवून दिल्याने तालुक्यात आनंदाचे वातावरण पसरले आहे.

        पाळज येथील गणेश मंदिराला तब्बल 71 वर्षांची परंपरा लाभली आहे, गणेशाची मूर्ती लाकडापासून बनविलेली असून मूर्तीची गणेशोत्सव दरम्यान 11 दिवस प्राणप्रतिष्ठा करण्यात येते, 11 दिवस पाळज येथे मोठी यात्रा भरत असल्याने दर्शनासाठी महाराष्ट्र, तेलंगणा, आंध्रप्रदेश, कर्नाटक यांच्यासह भारतातील ईतर राज्यातून भाविक भक्त लाखोंच्या संख्येने याठिकाणी गणेशोत्सव काळात दर्शनासाठी येत असतात.
       पाळजच्या गणेश मंदिराला तिर्थक्षेत्राचा दर्जा मिळाल्याची माहिती आज पत्रकार परिषदेत तालुका अध्यक्ष गणपत पिटेवाड, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी, नगरसेवक संतोष मारकवर, प्रकाश मामा कोंडलवार, सरपंच गंगाधर नारायण उपुवार, गणेश मंडळाचे अध्यक्ष लिंगाणा तोटावाड यांनी दिली आहे.