भोकर :(रमेश गंगासागरे ) सेवा समर्पण परिवारा कडून भोकरच्या दत्तगडाचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. याचाच एक भाग म्हणून या ठिकाणी तहसीलदार भरत सुर्यवंशी यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात आले. या पूर्वी दत्तगडावर १०० वृक्ष लावण्यात आले.
भोकर येथील सेवा समर्पण परिवार मागील सहा महिन्यांपासून सेवाभावी वृत्तीने काम करत आहे. या पूर्वी पाणी फाऊंडेशन वाटर कप स्पर्धेत सहभागी होत पाणी आडवा पाणी जिरवा ही मोहीम गतीमान करण्याचा प्रयत्न केले. किनीच्या स्मशान भुमीच्या सफाईपासुन श्रमदानाच्या कामाला सुरवात करण्यात आली. पाणी फाऊंडेशनच्या स्पर्धेमध्ये सहभागी होत पांडुरंना, आमदरी,नांदा खू,पोमनाळा, व कोळगाव येथे श्रमदान करून जलसंधारणच्या कामात सहभागी नोंदवला. कोळगाव येथे सेवा समर्थपणे परिवार ने भर उन्हात श्रमदान करून १२/३० चे शेततळे उभे केले. मागील दोन महिन्यांपासून भोकरच्या दत्तगडाचे सुशोभीकरण करण्याचे काम हाती घेतले आहे. या पूर्वी दत्तगडावरील तळ्याचे खोलीकरण, साफसफाई, व शंभर वृक्ष लावण्यात आले. दरवर्षी गडावर असलेल्या याच तळ्यात श्री चे विसर्जन करण्यात येते. याची सामाजिक दखल घेऊन ह्या तळ्याचे सुशोभीकरण करत आहे, या तळ्याभोवती तहसीलदार भरत सुर्यवंशी, मंडळ अधिकारी महेश वाकोडे, सेवा समर्पण परिवार चे बालाजी तुमवाड, राजेश्वर रेड्डी लोकावाड, डॉ उत्तम जाधव, नारायण कुमरे, विठ्ठल फुलारी, भगवान जोगदंड, माधव वडगावकर, गजानन रेड्डी, प्रशांत जोशी, अशोक रेड्डी, अनिल जाधव, रवी देशमुख, तलाठी मुंडगुलवार, डॉ किरण पांचाळ किशोर नरवाडे यांच्या प्रमुख उपस्थितीत वृक्षारोपण करण्यात आले.
" सेवा समर्पण परिवार निस्वार्थ पणे काम करत असल्याने या परिवाराचे कौतुक वाटते. या सेवाभावी कामात जी मदत हवी आहे ती मदत प्रशासनाच्या वतीने करण्यास येयील. हे काम निरंतर चालू राहावे.
- भरत सुर्यवंशी (तहसीलदार, भोकर) "

0 Comments