स्वखर्चातून केली 2200 शे फूट पाईप लाईन


     भोकर :-(रमेश गंगासागरे ) 

        भोकर पासून जवळच असलेल्या मौजे रेनापुर या गावात असलेल्या नवी आबादी मध्ये मागील दोन महिन्यापासून पाण्याची तीव्र टंचाई चालू आहे, पाणी मिळवण्यासाठी नागरिक एक किलोमीटर वरून पायपीट करत आहेत हे पाहून गावातील सामाजिक कार्यकर्ते वाजेद पठाण यांनी मानवतेच्या दृष्टिकोनातून स्वखर्चाने 2200 फूट पाण्याची पाईप लाईन टाकून नवी आबादी पर्यंत पाणी आणले, आणी गावकर्‍यांची तहान भागवली असल्याने वाजेद पठाण यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.
     
        रेणापूर येथे ग्रामपंचायत अस्तित्वात आहे, असे असताना दोन महिन्यापासून नवी आबादी येथे पाणी टंचाई चालू असताना नागरिकांना होणारा त्रास ग्रामपंचायतीने लक्षात घेतला नाही, परिणामी नागरिकांना मिळेल त्या वाहनाने एक किलोमीटर दूर वरून पाणी आणावे लागत होते, यामध्ये लोकांचा वेळ आणि श्रम वाया जात होता, ग्रामपंचायत कडून होणारा विलंब लक्षात घेऊन वाजेद पठाण यांनी तातडीने स्वखर्चातून दोन हजार दोनशे फूट पाईप टाकून नवी आबादी येथील पाण्याच्या टाकीपर्यंत पाणी आणून नागरिकांची तहान भागवली आहे, त्यामुळे नवी आबादी येथील असंख्य नागरिकांनी वाजेद पठाण यांचे पुष्पहार घालून अभिनंदन करून कृतज्ञता व्यक्त केली आहे. नागरिकाची स्वखर्चातून तहान भागवून वाजेद पठाण यांनी भोकर तालुक्यात एक नवा आदर्श निर्माण केला आहे त्यामुळे त्यांची भोकर तालुक्यात सगळीकडे वाहवा होत आहे.