भोकर :- (रमेश गंगासागरे ) आगामी काळात येणारी बकरी ईद, पोळा, नागपंचमी आधी सण उत्सवाच्या काळात नागरिकांनी शांतता व सुव्यवस्था अबाधित ठेवून पोलीस प्रशासनास सहकार्य करावे असे आव्हान भोकर येथील अप्पर पोलिस अधीक्षक श्री विजय पवार यांनी पोलीस स्टेशन मध्ये आयोजित शांतता कमिटीच्या बैठकीत केले आहे.
     
मनोगत व्यक्त करताना भोकर चे अप्पर पोलीस अधीक्षक 
     
        सदरील शांतता कमिटीच्या बैठकीत पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील, सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री सुरेश भाले, कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक सुभाष पाटील किनाळकर, शांतता कमिटीचे सदस्य श्रीमती सुलोचनाबाई ढोले, अहिल्याबाई जाधव, काँग्रेस अल्पसंख्यांक सेलचे तालुकाध्यक्ष मिर्झा ताहेर बेग, डॉक्‍टर फेरोज ईनामदार, प्रकाश कोंडलवार यांच्यासह अनेक नागरिकांची उपस्थिती होती पुढे बोलताना श्री विजय पवार म्हणाले की भोकर शहरात दुचाकीवर ट्रिपल सीट यापुढे कोणी जाऊ नये, आपल्या दुचाकीचे कागदपत्रे लायसन्स जवळ बाळगावीत, दुचाकीवर स्पष्टपणे नंबर प्लेट वापरावी, यापुढे दादा, भाऊ, चिंटू एकच वाघ, पाटील, ढाण्या वाघ, अशाप्रकारचे नंबर प्लेट दिसल्यास त्यांच्यावर मोठी दंडात्मक कारवाई करण्यात येईल, असेही त्यांनी यावेळी सांगितले, या सूचनाची नागरिकांनी काळजी घ्यावी अन्यथा त्यांचेवर मोठी दंडात्मक कार्यवाही करण्यात येईल असेही ते म्हणाले.
       कार्यक्रमाचे प्रास्ताविक आणि आभार भोकर पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक श्री विकास पाटील यांनी केले.