 |
| संग्रहित छायाचित्र |
या चालू हंगामामध्ये तालुक्यात सर्वत्र प्रजन्यमान अत्यल्प झाले असल्याने, सर्वच तलाव, नदी, नाले कोरडेठाक पडले आहेत, भोकर शहरातील नागरिकांना किनवट रोडवर असलेल्या सुधा नदीवरील प्रकल्पातून पिण्यासाठी पाणी पुरवठा होत असतो, आता जुलै महिना संपत आला तरी मोठा पाऊस अद्यापही पडला नाही जून-जुलैमध्ये काही अंशी झालेला पाऊस तप्त जमिनीने शोषून घेतल्यामुळे
सुधा नदीमध्ये पाणीच शिल्लक राहिले नाही,
परिणामी भोकरच्या नागरिकावर भर पावसाळ्यातच जल संकट ओढवले आहे, त्यामुळे भोकरचे नागरिक मोठ्या चिंतेत असल्याचे दिसून येते, यावर्षी मे महिन्यापासून भोकर नगरपरिषदेने चार दिवसाआड पाणीपुरवठा करून काही अंशी पाणी बचत केली होती, त्याचा थोडाफार आजपर्यंत फायदा झाला, आता सुधा प्रकल्पामध्ये पाणीच शिल्लक नसल्याने नगरपरिषदेने शहरातील पाणीपुरवठा बंद केला आहे, पण पावसाने यावर्षी सर्वांची घोर निराशा केली असल्याने तसेच मोठा पाऊस आज पर्यंत पडला नसल्याने, सर्वच जलसाठे कोरडे पडले आहेत, त्यामुळे नागरिकांवर भर पावसाळ्यात पाण्यासाठी भटकंती करावी लागत असल्याचे चित्र भोकर शहरात पहावयास मिळत आहे, यावर नगरपरिषदेने तातडीचा उपाय म्हणून नांदेड रोडवर असलेल्या आमदरीच्या तलावातून भोकर वासियांना पाणीपुरवठा करावा अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.
0 Comments