भोकर:-(रमेश गंगासागरे) जून महिना कोरडा गेला जुलै महिना पण पावसा विनाच जात असल्याने पेरणी करून बसलेल्या शेतकऱ्यावर दुबार पेरणीचे संकट आले आहे, त्यामुळे पाण्याविना पिकाचे,नागरिकांचे, शेतकरी, व प्राणांचे हाल होत आहेत, ते हाल यापुढे होऊ नयेत, आता तरी मोठा पाऊस पडावा म्हणून भोकर येथील वडार समाजाचे माजी नगरसेवक निळकंठ वर्षेवार यांनी समाजातील लोकांना सोबत घेऊन भांडाऱ्यासाठी पुढाकार घेतला होता.
निळकंठ वर्षेवार यांनी भोकर येथिल रिठा रोडवर असलेल्या भीमदेवापुढे भव्य भंडारा करणार असल्याचे व भांडारा जेवणासाठी सर्व नागरिकांनी येण्याचे एका आठवड्यापूर्वी पासून फेसबुक सारख्या शोषल मीडियातून आव्हान केले होते, त्यांच्या भांडाऱ्याला मोठ्या प्रमाणावर प्रतिसात मिळाला असून हजारो नागरिक, अबाल वृद्ध, महिला व पुरुषांनी भांडाऱ्याचा प्रसाद घेतला आहे, यावेळी भांडाऱ्या बाबद निळकंठ वर्षेवार यांची प्रतिक्रिया जाणून घेतली असता ते म्हणाले की, या ठिकाणी भीमदेवाच्या मंदिराची जागा असून, मोठा चबुतरा आहे, त्यावर दगडी व लाकडी मुर्त्या आहेत, आमची दीडशे वर्षांहून अधिक वर्षांची परंपरा लाभली आहे, देवापुढे मनोभावे पूजा अर्चा केल्यास पाऊस निश्चितच पडतो असे ते म्हणाले.
0 Comments