भोकर :-(रमेश गंगासागरे ) महाविद्यालयीन विद्यार्थ्यांसाठी उद्या दिनांक 6 जून रोजी सकाळी साडेनऊ वाजता भव्य व मोफत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन व कायदेविषयक शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
तालुका विधी सेवा समिती भोकर व दिगंबरराव बिंदू महाविद्यालय भोकर यांच्या संयुक्त विद्यमाने हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला असून विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करण्यासाठी धर्माबाद येथील सहाय्यक पोलिस अधिक्षक माननीय श्री नुरुल हसन यांची प्रमुख उपस्थिती लाभणार आहे, सदरील कार्यक्रमाचे अध्यक्ष भोकर येथील जिल्हा न्यायाधीश माननीय एम. एस. शेख हे राहणार आहेत, या शिबिरामध्ये स्पर्धापरीक्षेची तयारी एमपीएससी यूपीएससी व इतर स्पर्धा परीक्षेची तयारी करत असलेल्या विद्यार्थ्यांसाठी व बिंदू महाविद्यालय आणि शाहू विद्यालय येथील विद्यार्थ्यांसाठी सदरील स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे, सदरील विद्यार्थ्यांना कायदेविषयक माहिती देण्यासाठी जिल्हा न्यायाधीश माननीय एम.एस. शेख हे सखोल मार्गदर्शन करणार आहेत, तरी या कार्यक्रमास जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी उपस्थित राहून लाभ घ्यावा असे आवाहन तालुका विधी सेवा समिती भोकर त्यांनी केले आहे.

0 Comments