दिल्ली (वृत्तसंस्था) रमेश गंगासागरे 
       डिस्कवरीवरील मॅन Vs वाईल्ड या कार्यक्रमात अनेक थरारक गोष्टी पाहायला मिळतात. हा कार्यक्रम जगभरातील लोकं मोठ्या आवडीने बघतात. बियर ग्रिल्स हा ज्या प्रकारे जंगलात कशा प्रकारे राहतो आणि कशा प्रकारे प्राण वाचवले जावू शकतात याची माहिती देतो. ते सगळ्यांनाच पाहायला आवडतं. पण आता या कार्यक्रमात भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे देखील दिसणार आहेत. १२ ऑगस्टला रात्री ९ वाजता हा कार्यक्रम प्रदर्शित होणार आहे. पंतप्रधान मोदींनी जंगलात कशा प्रकारे वेळ घालवला याबाबत अनेकांना उत्सुकता आहे.

       
       कार्यक्रमाचे सुत्रसंचालक बेअर ग्रिल्सनेच यासंदर्भात ट्विट करुन माहिती दिली आहे.बेअर ग्रिल्सने ट्विटवरुन एक टिझर पोस्ट केला आहे. या ट्विटमध्ये तो म्हणतो, ‘जगभरातील १८० देशांच्या लोकांना पंतप्रधान नरेंद्र मोदींची याआधी कधीही न पाहिलेली बाजू पहायला मिळेल. प्राण्यांचे संवर्धन करण्यासाठी आणि वातावरणातील बदलाकडे लक्ष्य वेधण्यासाठी मोदी भारतामधील जंगलांमधून फिरताना दिसतील. पंतप्रधाननरेंद्र मोदींसोबतचे मॅन व्हेर्सेस वाइल्ड नक्कीपाहा डिस्कव्हरी इंडियावर ऑगस्ट १२ रोजी रात्री नऊ वाजता.पंतप्रधान नरेंद्र मोदी हे वेगवेगळ्या प्रसारमाध्यमांचा वापर करुन जास्तीत जास्त तरुणांपर्यंत पोहचण्याचा प्रयत्न करताना दिसतात.मॅन व्हेर्सेस वाइल्ड मधील त्यांचा सहभाग हा प्राणी संवर्धनाचा संदेश देण्यासाठीचा असाच एक प्रयत्न आहे. या व्हिडिओमध्ये पंतप्रधान मोदी बेअरचे स्वागत करताना दिसत आहेत. नंतर हे दोघे जंगलामधून, बोटीमधून प्रवास करतानाची दृष्ये या टीझरमध्ये आहेत. मोदींना थंडी वाजू नये म्हणून बेअर एका दृष्यात मोदींना कोट देतानाही दिसत आहे.हा कार्यक्रम खऱ्या अर्थाने ‘फन राइड’ असेल असं या व्हिडिओत म्हटले आहे.