भोकर:(रमेश गंगासागरे ) माजी केंद्रीय गृहमंत्री महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री डॉक्टर शंकररावजी चव्हाण यांच्या जन्मशताब्दी वर्षानिमित्त भोकर येथे दिनांक 14 जुलै 2019 रोजी मोफत भव्य रोग निदान उपचार व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.
     
       भोकर तालुका काँग्रेस कमिटी तर्फे दरवर्षी शंकररावजी चव्हाण यांच्या जयंतीनिमित्त भोकर शहरात विविध उपक्रम राबविले जातात त्याचाच एक भाग म्हणून दिनांक 14 जुलै रोजी कृषी उत्पन्न बाजार समितीच्या शेतकरी निवास सात सकाळी दहा ते दुपारी तीन वाजेपर्यंत आरोग्यतपासणी करण्यात येत असल्याचे दिलेल्या प्रसिद्धीप्रमुख पत्रकात म्हटले आहे सदर कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून अशोकराव  चव्हाण माजी मुख्यमंत्री तथा प्रदेशाध्यक्ष, कार्यक्रमाचे अध्यक्ष आमदार अमिता ताई चव्हाण राहणार असून कार्यक्रमात  प्रमुख पाहुणे म्हणून नांदेड जिल्हा काँग्रेस कमिटीचे जिल्हाध्यक्ष गोविंदराव शिंदे नागेलीकर यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे, सदरील कार्यक्रमास तालुक्यातील जास्तीत जास्त नागरिकांनी या मोफत रोग निदान व उपचार शिबिराचा लाभ घ्यावा असे आव्हान तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर, संगीता विनोद चिंचाळकर, नगराध्यक्ष जरीना बेगम युसुफ शेख उपनगराध्यक्ष आणि रमीज इनामदार शहराध्यक्ष यांनी केले आहे.