भोकर :- (रमेश गंगासागरे ) शेतकऱ्यांच्या विविध मागण्यांसाठी तसेच भोकर तालुक्यातील विकास कामांबाबत भोकर तहसीलवर महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री अशोक चव्हाण यांच्या नेतृत्वाखाली एक दिवशीय धरणे आंदोलन करण्यात आले.

      शेतकऱ्यांना सरसकट कर्जमाफी करावी, शेतकऱ्यांना तात्काळ खरीप पिकासाठी कर्ज वाटप करावे, महामंडळाचे बी- बियाणे शेतकऱ्यांना उपलब्ध करून द्यावे, भोकर फाटा ते राहाटी पर्यंतच्या राज्य रस्त्याचे काम त्वरित चालू करावे, भोकर उड्डाणपुलाचे काम त्वरित चालू करण्यात यावे, शेतकऱ्यांना पीक विमा मंजूर करण्यात यावा, भोकर स्टेट बँक ऑफ इंडियाचे लवकरच विस्तारीकरण करण्यात येऊन नागरिकांची होणारी गैरसोय टाळावी या व इतर मागण्यांसाठी आज गुरुवार दिनांक 4 जुलै 2019 रोजी सकाळी 11 पासून तहसील कार्यालय व उपविभागीय अधिकारी कार्यालय भोकर च्या समोर भव्य धरणे आंदोलन करण्यात आले, यावेळी प्रकाश पाटील भोसीकर, मंगाराणी अंबुलगेकर, जगदीश पाटील भोसीकर, विनोद पाटील चिंचाळकर, हमीद खान पठाण, खाजू इनामदार, श्याम सुंदर मेटकर, सिद्धार्थ पिटलेवाड, यांच्यासह असंख्य काँग्रेस प्रेमींची व कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, कार्यक्रमाचे सूत्रसंचालन पत्रकार रामचंद्र मुसळे यांनी केले, कार्यक्रमात अनेक कार्यकर्त्यांनी भाषणबाजी करून परिसर दणाणून सोडला होता.