भोकर :- रमेश गंगासागरे 
    -----------------------
       साथीच्या रोगाबाबत भोकर न्यूज लाईव्ह मध्ये वृत्त प्रकाशित होताच हत्तीरोग नियंत्रण पथकाचे कर्मचारी गल्लीबोळात दिसू लागले



        भोकर शहर व तालुक्यात साथीच्या रोगाची लागण झाल्याचे वृत्त भोकर न्यूज लाईव्ह मध्ये दिनांक 25 जुलै 2019 रोजी प्रकाशित होताच भोकर येथील हत्तीरोग नियंत्रण पथकाचे कर्मचारी आज दिनांक 26 जुलै रोजी भोकर शहरात सकाळपासून गल्लीबोळांमध्ये कार्यरत झाल्याचे दिसून आले.
     
सध्या नागरिकांना हिवताप, डेंगू, मलेरिया, चिकनगुनिया या सारख्या आजाराने ग्रासले असून भोकर शहरातील सरकारी व खाजगी दवाखाने हाऊसफुल्ल झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे, असे असताना संबंधित विभागाने मात्र एका आठवड्यापासून नागरिकांच्या हितासाठी कोणतीच दखल घेतलेली दिसून आली नसल्याने दिनांक 25 जुलै रोजी भोकर न्यूज लाईव्ह मधून याबाबत वृत्त प्रकाशित झाले होते, या वृत्ताची दखल आज हत्तीरोग नियंत्रण कार्यालयातील कर्मचाऱ्यांनी घेतली असून त्यांनी वार्ड क्रमांक 11 मध्ये गल्लीबोळात औषध फवारणी करताना दिसून आले, वार्ड क्रमांक 11 सह इतरही वार्डामध्ये फवारणी करण्यात यावी अशी मागणी आता जोर धरू लागली आहे.