हदगाव:-(भगवान शेळके ) नांदेड जिल्यातील हदगाव तालुक्याला वरिष्ठ पातळीवरून दुर्लक्षित केले जात असताना त्यात निसर्गाने साथ सोडल्यामुळे तालुक्यातील शेतकऱ्यांना ऐन पावसाळ्यात जाणवत असल्याने, दुबार पेरण्या झाल्या ,अन आता तिसरी पेरणी करण्याची वेळ आली कारण सर्वात कमी पाऊस हदगाव तालुक्यात झाला,काही प्रमाणात पाऊस पडल्यामुळे शेतकऱ्यांनी पेरण्या केल्या,परंतु पेरण्या झाल्या व पाऊस गायब झाल्यामुळे निघालेले, सोयाबीन, कापुस, तूर, मुग, उडीद,हळद आज गेल्यात जमा आहेत,उन्हाचा तडाखा बसल्यामुळे निघालेले पीक वाळून जात आहेत ,शेतकऱ्यावर पहिलाच कर्जाचा डोंगर, कसेबसे बियाणे ,खत आणून पेरणी केली ,तर निसर्गाने दडी मारल्यामुळे शेतकऱ्यावर आज उपास मारीची वेळ आली,रोजदाराला काम नाही,जनावराला वैरणीचा काळ, पिण्यासाठी पाणी नाही,विहिरी,बोर आटून जात आहेत कारण आज जवळपास अकरा महिन्यापासून पाणी पडलेले नाही,त्यात याही पावसाळ्यात पाणी नाही शेतकऱ्यांनी काय करावे ,गंभीर प्रश्न उपस्थित झाला आहे,हदगाव तालुक्यात चाळीस वर्षाच्या वर झाले असतील असा कोरडा दुष्काळ पडला नाही असे बुजरूक माणसे सांगत आहेत,
खर्च कमी होईना ,पाऊस पडत नाही, पिके वाळून जात आहेत,मुलींचे लग्न,मुलांचे शिक्षण, त्यांची फिस मग खाजगी शाळा,टिव्हीशन फिस कशी द्यायची ,पहिलेच कर्जने शेतकऱ्याची कमबर मोडली आहे,शासन स्तरावर कोणतेही निर्णय घेण्यात आले नाहीत,शेतकऱ्यांचे कर्ज भरण्यासाठी बँका तगादा लावत आहेत,काही शेतकऱ्यांनी,शेतमजुरांनि खाजगी बँकेचे कर्ज घेतले, काहींचे हप्ते हे दर आठवड्याला तर काहींचे तीन,सहा महिन्याला ,तर काहीच वर्षाला भरावे लागत आहेत,कारण कोणी आशा प्रकारचे कर्ज काढून कोणीही मुलीचे लग्न केले, तर काहींनी मुलांच्या शिक्षणासाठी कर्ज घेतले ,ते पुढील उत्पादनाच्या आशेवर परंतु निसर्गाने दांडी मारल्यामुळे ,सर्वावर आज आत्महत्या शिवाय पर्याय उरला नाही अशी परिस्थिती आज तालुक्यातील शेतकऱ्यांची,शेतमजूर यांची झाली आहे,नेते मंडळी आपल्या कामात व्यस्त तर शेतकरी झाले फस्त, शेतकऱ्यांचे दुःख कोणीही जाणून घेण्यासाठी कोणताही नेता सरसावलेला दिसत नाही,
हदगाव विधानसभेकडे दुर्लक्षच केल्याचेही शेतकऱ्यातून बोलल्या जात आहे,परंतु आशा होती नव्याने हिंगोली लोकसभेचे खासदार हेमंत पाटील यांची तेतरी पावसाने दडी मारल्यामुळे शेतकरी यांच्याशी चर्चा करावी अशी मागणी केली जाते आहे.

0 Comments