भोकर :-(रमेश गंगासागरे ) यावर्षी पावसाच्या लहरीपणामुळे तालुक्यातील शेतकरी अडचणीत आला असून पर्जन्यमान अत्यल्प झाले असल्याने नदी-नाले कोरडेठाक पडले आहेत, जनावरांचा चारा आणि पाण्याचा मोठा प्रश्न शेतकऱ्यांपुढे उभा ठाकला आहे, पाऊस नसल्याकारणाने पिके करपून जात आहेत, त्यामुळे तालुक्यातील शेतकरी पुरता वैतागला असून त्यांनी मावळा संघटनेच्या वतीने आज गुरुवार दिनांक 25 जुलै 2019 रोजी दुपारी यल्गार मोर्चाचे आयोजन करून आपल्या भावना शासनाला कळविण्यात आल्या आहेत.
     
       मावळा संघटनेच्यावतीने शासनाला देण्यात आलेल्या मागण्यांचा निवेदनात म्हटले आहे की, 1) शेतकऱ्यांना सरसकट पिक विमा देण्यात यावा, 2)  भोकर तालुक्यातील पिकांचे तात्काळ पंचनामे करून भोकर तालुका दुष्काळग्रस्त जाहीर करावा, 3) तालुक्यातील जनावरांसाठी चारा छावण्या तात्काळ उभाराव्यात, 4)  शेतकरी पीक कर्ज सरसगट तात्काळ माफ करण्यात यावे व नवीन पीक कर्ज शेतकर्‍यांना तात्काळ देण्यात यावे 
       वरील मागण्या शासनाला देण्यात आलेल्या निवेदनात करण्यात आले आहेत, सदरील मोर्चाचे आयोजन भोकर तालुका मावळा संघटनेच्यावतीने करण्यात आले होते, एल्गार मोर्चा मध्ये मोठ्या संख्येने तालुक्यातील हजारो शेतकरी सामील झाले होते, हा मोर्चा मुख्य रस्त्याने तहसीलवर येऊन धडकला आणि याठिकाणी छोट्याश्या जाहीर सभेत रूपांतर झाले, यावेळी अनेक मान्यवरांनी आपले मनोगत व्यक्त केले, शेवटी तहसील जवळ शेतकऱ्यांसाठी अल्पउपहाराचा कार्यक्रम घेण्यात येऊन मोर्चा संपन्न झाला.