भोकर :- (रमेश गंगासागरे ) शासनाने शेतकऱ्यांसाठी पिक विमा भरण्याची मुदत 24 जुलै 2019 ठरवून दिली होती, परंतु काही भागात जून व जुलै महिन्यात पेरणी करण्याइतपत तही पाऊस झाला नाही,
       तर काही भागात दुबार आणि तिबार पेरण्या झालेल्या आहेत, त्यामुळे शेतकरी पूर्ण हतबल झाला असून त्याच्याकडे पिक विमा भरण्यास पैसे उरले नाहीत उसनवारी करून शेतकरी पिक विमा भरताना दिसून येत आहे, म्हणून शासनाने पीक विमा भरण्याची मुदत 31 जुलै 2019 पर्यंत वाढवून द्यावी अशी विनंती, एका निवेदनाद्वारे भोकर कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक रामचंद्र विठ्ठलराव मुसळे यांनी महाराष्ट्राच्या कृषी मंत्र्याकडे तहसीलदार भोकर यांच्या मार्फत केली आहे.