भोकर :- (रमेश गंगासागरे )   तालुक्यात सर्वत्र दुबार पेरणी करूनही पावसाअभावी पीके आले नाही, आता तिसऱ्या पेरणीने परेशान झालेल्या शेतकऱ्यांनी आज  सोमवार दिनांक 22 जुलै 2019 रोजी सकाळी 11 वाजता हजारो महिला व पुरुषांसह आपल्या विविध मागण्यांसाठी ढोल ताशाच्या गजरात भव्य मोर्चा काढून प्रशासनाचे लक्ष वेधून घेतले आहे.
     
           तहसीलदार भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की,
१) तिसऱ्या पेरणीसाठी बियाणे व भरीव आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी.

२)  जनावरांसाठी चारा छावण्या तात्काळ उभारण्यात यावेत .

३)  सन 2017- 18  मधील पिक विमा मंजूर करण्यात यावा .

४) तसेच प्रधानमंत्री शेतकरी सन्मान योजनेतील शेतकऱ्यांना त्वरित त्यांच्या खात्यावर पैसे जमा करण्यात यावेत,

         आदी मागण्यांसह तहसीलदार भोकर यांना असंख्य शेतकरी महिला व पुरुषांच्या सहीनिशी निवेदन देण्यात आले.