भोकर :- (रमेश गंगासागरे ) भोकर ते रहाटी पर्यंत सध्या राज्य रस्त्यावर संथ गतीने काम चालू असून या संथगतीच्या कामाने आज एका टिप्पर चालकाचा बळी घेतला आहे  तर दुसरा चालक गंभीर जखमी झाला आहे.
       
          घटनेविषयी समजलेली थोडक्यात माहिती अशी की, आज गुरुवार दिनांक 18 जुलै रोजी सकाळी 10 ते 11 वाजण्याच्या सुमारास सोनारी गावाजवळ एक टिप्पर क्रमांक एम एच 20 डी इ 9 5 0 0 हा रोडवर चालू असलेल्या कामावर मुरूम टाकत होता, त्या टिप्परला भोकरकडे येणारा एका ट्रक क्रमांक एपी 16 टी एच 14 57 ने समोरासमोर जोराची धडक दिली, या धडकेत टिप्पर चालक राजू नामदेव वैद्य वय वर्ष 42 राहणार औरंगाबाद यांचा जागीच मृत्यू झाला, तर दुसरा चालक शिवा प्रसाद यास गंभीर दुखापत झाली आहे, त्यास अधिक उपचारासाठी नांदेड येथील सरकारी रुग्णालयात पाठविण्यात आले आहे. प्रत्यक्षदर्शींनी सांगितले की अपघात एवढा भयानक होता की राजू वैद्य या चालकाचा मृतदेह ट्रकमधून जेसीबीच्या साह्याने बाहेर काढण्यात आला होता.