भोकर :- (रमेश गंगासागरे ) दोन वर्षांपूर्वी तालुक्यातील थेरबन येथील बहुचर्चित दुहेरी खून खटल्यातील दोनही आरोपींना आज दोषी ठरवण्यात आले आहे.
       
 
 हेच ते कर्तव्यदक्ष तपास अधिकारी
         घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, आरोपी नामे दिगंबर बाबुराव दासरे व मोहन नागोराव दासरे यांनी त्यांची सख्खी बहीण नामे पूजा ही दिनांक 23 जुलै 2017 रोजी ती इतर समाजाचा व त्यांच्याच गावातील मुलगा नामे गोविंद विठ्ठल कराळे यांच्या सोबत मौजे खरबळा तालुका मुधोळ जिल्हा निर्मल तेलंगाणा ईथे पळून गेल्याचा राग मनात धरून, त्यांचा खून करण्याच्या उद्देशाने बहिणीस व गोविंद कराळे यास विश्वासात घेऊन तुमचे बासर येथे लग्न लावून देतो, असे म्हणून त्यांनी त्यांच्या मोटारसायकलवरून त्यांना भोकरकडे घेऊन येत असताना, त्यांनी आपली मोटारसायकल दिवशी तालुका भोकर येथील शिवारात थांबवली व पूजा आणि गोविंद यास तेथील नाल्यात नेऊन झुडूपाच्या आड त्यांच्या गळ्यावर विळ्याने सपासप वार करून अत्यंत निर्दयपणे त्या दोघांनाही ठार केले होते, या खटल्याची सुनावणी आज दिनांक 17 जुलै 2019 पासून रोजी जिल्हा व सत्र न्यायालय वर्ग 1 न्यायाधीश श्री एम एस शेख यांच्या न्यायालयात चालू असून ह्या दोन्ही आरोपींना आज न्यायाधीशांनी खुनाच्या गुन्ह्यात दोषी ठरवले आहे, आता ह्या दोन्ही दोषींना काय सजा मिळते हे उद्याचा काळच ठरवेल, या खून खटल्यात  सरकार पक्षातर्फे एकूण सहा साक्षीदार तपासण्यात आले होते, त्या सहाही साक्षीदारांनी दिलेली साक्ष ग्राह्य मानून  त्यांना  शिक्षा ठोठावण्यात येईल, सरकारी पक्षातर्फे श्री रमेश राजूरकर यांनी आपली बाजू भक्कमपणे मांडली  तर आरोपी बचाव पक्षातर्फे ॲडव्होकेट मोहन जाधव यांनी  आपली बाजू मांडली, तपासीक अधिकारी श्री सुशील चव्हाण  पोलीस उपनिरीक्षक भोकर  व जमादार जाधव  यांनी  तपास केला, सदरील घटनेचा खटला  कोर्टात चालू असताना  बाहेर आरोपीच्या नातेवाईकांनी, मित्रांनी व नागरिकांनी प्रचंड गर्दी केली होती, कोर्टाच्या आवारात काही अनुचित प्रकार घडू नये म्हणून सहाय्यक पोलीस निरीक्षक श्री भाले यांनी तगडा बंदोबस्त लावला होता. खून झाला त्या घटनेपासून दोन्ही आरोपी आजपर्यंत जेलमध्येच होते, त्यांना आजपर्यंत अंतरिम जामीन मिळाला नव्हता हे विशेष.उद्याच्या निकालाकडे आता समबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.