भोकर : (रमेश गंगासागरे )  येथील सेवालाल गडावर आज दिनांक 16 जुलै 2019 रोजी भोकर पंचायत समितीच्या सभापतीचे प्रतिनिधी श्री गुलाब नाईक यांच्या हस्ते वृक्षारोपण करण्यात येऊन जन्मोत्सव व गुरू पूजनाचा कार्यक्रम करण्यात आला.
     
       यावेळी त्यांनी गडावर भक्तांसाठी पाण्याची सोय व्हावी म्हणून एक बोअरवेल देण्याचे जाहीर केले आहे, या प्रसंगी सेवालाल गडाचे व्यवस्थापक बाळू महाराज, साईराम राठोड, ईश्वर जाधव, डॉक्टर अनिल जाधव, गडाचे पुजारी लच्छीराम महाराज, अमृत बाबू जाधव, आनंद जाधव यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती, यावेळी त्यांनी नागरिकासोबत महाप्रसाद घेतला, गडावर होत असलेल्या अनेक सामाजिक कार्यामुळे सभापती श्री गुलाब नाईक यांनी समाधान व्यक्त केले आहे, गडावर दिवसेंदिवस भाविक भक्तांची व पर्यटनास येणाऱ्या नागरिकांची संख्या वाढत आहे ही संख्या लक्षात घेऊन गडावर नागरिकांना पिण्याच्या पाण्याची सोय व्हावी म्हणून गुलाब नाईक यांनी मोठा निर्णय घेतला असून त्यांनी येत्या काही दिवसातच एक बोअरवेल मारून देण्याचे आश्वासन दिल्याने भक्तांमध्ये आनंदाचे वातावरण पसरले आहे.
       काही दिवसा खालीच नांदेड जिल्ह्याचे नवनिर्वाचित खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर यांनीसुद्धा गडावर येऊन दर्शनाचा लाभ घेतला होता, त्यांनीसुद्धा गडाचे विस्तारीकरण करून इथे मूलभूत सुविधा उपलब्ध करून देण्याचे वचन दिले आहे, त्यामुळे सेवालाल गडाला तालुक्यात विशेष महत्त्व प्राप्त झाले असून या ठिकाणी नागरिक दर्शनासाठी मोठ्या संख्येने येत आहेत.