भोकर :- (संदिप गंगासागरे ) अ.भा. गुरू रविदास समता परिषद शाखा भोकर यांच्या वतीने आज रविवार दिनांक 14 जुलै 2019 रोजी भोकर येथील दत्त गडाच्या माथ्यावर अ.भा. गुरु रविदास समता परिषदेचे भोकर तालुका अध्यक्ष तथा पत्रकार रमेश जी. गंगासागरे  आणि  अ.भा. गुरु रविदास समता परिषदेचे  तालुका सचिव संतोष नरवाडे  यांच्या नेतृत्वाखाली मोठ्या प्रमाणावर वृक्षारोपण करण्यात आले.

       दत्त गडाच्या माथ्यावर मागील दोन दिवसापासून वृक्षारोपणासाठी अ.भा. गुरु रविदास समता परिषदेच्या तरुण कार्यकर्त्यांनी मोठ्या प्रमाणावर खड्डे खोदले होते, त्या खड्यात आज रविवारी सकाळी साडेसहा ते साडे आठच्या दरम्यान वड, पिंपळ, गुलमोहर, सदाफुली, लिंब, शिसम, करंजी, अशा प्रकारचे 50 ते 55 झाडे लावण्यात आले, असून करण्यात आलेले वृक्षारोपण जगवण्यासाठी अ.भा. गुरु रविदास समता परिषदेच्या कार्यकर्त्यांनी एक मुखी शपथ घेतली आहे. आज वृक्षारोपणा मध्ये जेष्ठ कार्यकर्ते निवृत्ती वाघमारे, पिंटू कावळे, आकाश कुंडलकर, गणेश दूधकावडे, नवनाथ वाघमारे, गजानन वाघमारे, बालाजी खंदारे, सुरेश गंगासागरे, बालाजी गंगासागरे, संदीप गंगासागरे, आशिष गंगासागरे, सचिन गंगासागरे, सतिष गंगासागरे, गिरीष गंगासागरे, कुमारी दुर्गा खंदारे, बालाजी वाघमारे, सौरव खंदारे, श्रीकांत नरवाडे, प्रेम खंदारे, पाराजी साबणे आणि अ.भा. गुरु रविदास समता परिषदेचे तालुकाध्यक्ष रमेश गंगासागरे यांनी सहभाग घेतला होता.