भोकर येथील लोक न्यायालयाचा उचांक अनेक प्रकरणे तडजोडीने निकाली काढली.
----------------------------------------------------
एका कुटुंबाचा पुन्हा जुळवला संसार जिल्हा न्यायाधीश श्री मुजीब शेख यांच्या प्रयत्नांना यश
----------------------------------------------------
भोकर :-(रमेश गंगासागरे )
आज दिनांक 13 जुलै 2019 रोजी भोकर येथे लोक अदालतीचे आयोजन करण्यात आले होते, यात 701 प्रकरणे ठेवण्यात आली होती, त्यामध्ये 63 लाख 62 हजार 887 रुपयांचे वसुली व वसुली साठी अवार्ड पास करण्यात आले आहे. आज पर्यंतच्या लोकन्यायालयातील हा उच्चांक असल्याचे बोलल्या जात आहे. तर एका कुटुंबाचा तुटलेला संसार पुन्हा जोडण्यात न्यायमूर्ती मुजीब शेख यांना यश आले आहे.
आज होऊ घातलेल्या लोकन्यायालय मध्ये वीज वितरण कंपनी, ग्रामपंचायत मधील थकीत घरपट्टी व नळपट्टी, बँकेतील कर्ज प्रकरणे आदी प्रकरणांमध्ये प्रलंबित असलेल्या केसेस ठेवण्यात आल्या होत्या, यामध्ये तडजोडीअंती मोठ्या प्रमाणात वसुली
करण्यात आली आहे, तर अनिता पाशमवाड राहणार सावरगाव व पोतना पाशमवाड च्यातील कौटुंबिक वाद संपुष्टात आणून त्यांचा न्यायालयाच्या वतीने समझोता करून त्यांना साडी आणि चोळीचा आहेर करून पाठवणी करण्यात आली, दाखलपूर्व प्रकरणात 8810 प्रकरने ठेवण्यात आली होती, त्यात 639 प्रकरणे निकाली काढण्यात येऊन त्यामध्ये 24 लाख 18 हजार 163 रुपये एवढ्या रकमेची वसुली व वसुली साठी अवार्ड पास करण्यात आले आहे. यासाठी न्यायालयातील सर्वच न्यायमूर्तींनी अफाट मेहनत घेतल्याचे दिसून आले.


0 Comments