भोकर :- (रमेश गंगासागरे ) भोकर येथील सामाजिक कार्यकर्ते संजय घंटलवार यांच्या कार्याची दखल घेऊन त्यांना नांदेड येथील मीमांसा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य मराठी पत्रकार संघ, दैनिक समीक्षा, मंथन क्रिएटिव ग्रुप व ह्युमन राईट्स फाउंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने दरवर्षी दिल्या जाणाऱ्या डॉ. शंकररावजी चव्हाण गुरुरत्न पुरस्कारासाठी त्यांची निवड करण्यात आली आहे.
संजय घंटलवार हे मागील अनेक वर्षापासून सेवा प्रतिष्ठान संस्थेच्या माध्यमातून अनेक गोरगरीब व उपेक्षितांची मदत केली आहे, त्याच प्रमाणे यावर्षी पाणी फाउंडेशन ने आयोजित केलेल्या वॉटर कप स्पर्धेमध्ये अनेक गावात त्यांनी तीकाशी, फावडे, टोपली यासह भरीव आर्थिक मदतही दिली आहे, या त्यांच्या कार्याची दखल घेऊन नांदेड येथील मीमांसा फाउंडेशन यांनी त्यांना डॉ. शंकररावजी चव्हाण गुरुरत्न पुरस्कारासाठी यांची निवड केली आहे, संजय घंटलवार यांना सामाजिक कार्यासाठी हा पुरस्कार दिला जाणार आहे, त्यांना नांदेड येथील कुसूम सभागृहात दिनांक 14 जुलै 2019 रोजी संध्याकाळी अनेक प्रतिष्ठित मान्यवरांच्या हस्ते हा पुरस्कार दिला जाणार आहे.
संजय घंटलवार यांना पुरस्कार जाहीर झाल्याचे कळताच सेवा प्रतिष्ठान भोकरच्या कार्यकर्त्यात नवा उत्साह निर्माण झाल्याचे दिसून आले, घंटलवार यांना पुरस्कार मिळाल्याने त्यांचे अनेक स्तरातून अभिनंदन होत आहे.

0 Comments