स्मार्ट कार्ड मिळवण्यासाठी ज्येष्ठ नागरिकांची तोबा गर्दी

भोकर :-रमेश गंगासागरे

    ज्येष्ठ नागरिकांना  पूर्वी  आधार कार्डच्या आधारे एस टी महामंडळ कडून प्रवास भाड्यात सवलत दिली जात असे आता आधार कार्ड काही महिन्यात कालबाह्य ठरत असून एस टी महामंडळ स्वतः अल्प दरामध्ये ज्येष्ठ नागरिकांना स्मार्ट कार्ड देऊन त्याआधारे प्रवाशांना एसटीने प्रवास करण्याची सुविधा उपलब्ध करून देत आहे.
       अल्प दरातील स्मार्टकार्ड घेण्यासाठी तालुक्यातील ज्येष्ठ नागरिकांच्या भल्या पहाटेपासूनच लांबच लांब रांगा लागत असल्याचे चित्र सध्या एसटी महामंडळ परिसरात पहावयास मिळत आहे, एसटी महामंडळाने यासाठी ज्यादा खिडक्या ठेवण्याची व्यवस्था करावी असेही या नागरिकांतून बोलले जात आहे, ऑनलाइन स्मार्ट कार्डची नोंदणी करण्यासाठी एका नागरिकांना भरपूर वेळ लागत असल्याने महिला व पुरुष सकाळी सहा वाजल्यापासून एसटी महामंडळाच्या खिडकीजवळ तोबा गर्दी करताना दिसून येत आहेत. अशा नोंदणीसाठी आलेल्या सर्व ज्येष्ठ नागरिकांना महामंडळातर्फे पिण्याच्या पाण्याची व नाश्त्याची सोय करावी असेही जेष्ठ नागरिकांमधून बोलल्या जात आहे.