भोकर :-(रमेश गंगासागरे ) भोकर शहरातील काँग्रेस पक्षाचे जुने व निष्ठावंत कार्यकर्ते ताहेर बेग यांची आज मंगळवार दिनांक 23 जुलै 2019 रोजी काँग्रेस अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्षपदी माजी खा. अशोक चव्हाण यांनी निवड केलयाचे पत्र भोकर च्या आमदार सौ. अमिता भाभी चव्हाण यांनी त्यांना दिले आहे.
ताहेर बेग हे मागील अनेक वर्षांपासून काँग्रेस पक्षासोबत एकनिष्ठ राहून काँग्रेस पक्षाची व कार्यकर्त्यांची सेवा केली होती, ह्या पूर्वी त्यांनी काँग्रेसच्या फादर बॉडीचे शहराध्यक्ष मिळावे ह्यासाठी स्पर्धेमध्ये प्रयत्नशील असल्याचे बोलल्या जात आहे, पण काँग्रेसने त्यांना शहराध्यक्षपद न देता त्यांची थेट अल्पसंख्यांक सेलच्या तालुकाध्यक्ष पदावर नियुक्ती करून त्यांच्या कार्याची दखल घेतली आहे, ताहेर बेग यांच्या निवडीने सर्व काँग्रेस कार्यकर्त्यात आनंदाचे व उत्साहाचे वातावरण पसरले आहे, त्यांच्या निवडीवेळी जिल्हाध्यक्ष नागेलीकर , तालुकाध्यक्ष जगदीश पाटील भोसीकर ,भोकरचे माजी नगराध्यक्ष विनोद पाटील चिंचाळकर, बाळू पाटील चिंचाळकर, बाबुराव सायाळकर, शहराध्यक्ष खाजू भाई इनामदार, अखिल मांजरमकर, विक्रम शिरसागर, सिद्धार्थ पिटलेवाड यांच्यासह असंख्य कार्यकर्त्यांची उपस्थिती होती.
यावेळी भोकर न्यूज लाईव्हशी ताहेर बेग बोलताना म्हणाले की, माजी खासदार अशोकराव चव्हाण, आमदार अमिता भाभी चव्हाण यांनी जी माझ्यावर जबाबदारी टाकली आहे त्या जबाबदारीला पदाला तसेच काँग्रेस पक्षाला कसल्याही प्रकारचे गालबोट न लागता मी एकनिष्ठेने व तन-मन-धनाने काँग्रेस पक्षाची सेवा करीन, मला काँग्रेसचे तालुका अल्पसंख्यांक सेलचे अध्यक्षपद दिल्याने मी खासदार अशोक चव्हाण आमदार अमिता भाभी चव्हाण व सर्व कार्यकर्त्यांचे धन्यवाद व्यक्त करतो असे ते म्हणाले.


0 Comments