भोकर :- (रमेश गंगासागरे )  भोकर मध्ये शालेय विद्यार्थ्यांना क्लासेसच्या माध्यमातून परिपूर्ण ज्ञान देणारे अनेक क्लासेस असून या क्लासेस पैकी विनोदसर'स् अकॅडमीचा 2019 चा दहावी आणि बारावीचा निकाल तालुक्यात सर्वोत्कृष्ट आहे.

         याबाबत विनोद सर अकॅडमीचे संचालक श्री, गजानन श्रीखंडे, व विनोद सर यांनी भोकर न्यूज लाईव्हला सांगितले की, भोकर व भोकर तालुक्यातील अनेक विद्यार्थी उत्कृष्ट शिक्षणाअभावी भोकर सोडून नांदेड येथे जाऊन खर्चिक शिक्षण घेत आहेत, अशा विद्यार्थ्यांची गैरसोय होऊ नये म्हणून भोकर मध्येच एका छताखाली इयत्ता पाचवी ते बारावी पर्यंतचे सेमी इंग्रजी व मराठी माध्यमाचे क्लासेस व अतिरिक्त वर्ग घेऊन विद्यार्थ्याकडे वैयक्तिक रित्या लक्ष देऊन अत्यंत साध्या व सोप्या पद्धतीत विद्यार्थ्यांना समजावून सांगण्यात येत आहे, त्यामुळे यावर्षी दहावी व बारावी चा निकाल सर्वात जास्त असल्याचे त्यांनी सांगितले ते बोलताना पुढे म्हणाले की, इयत्ता दहावी सेमी मध्ये 24 विद्यार्थी 80% च्या वर तर बारावी मधील अकरा विद्यार्थी हे 75% च्या वरचे असल्याचे त्यांनी सांगितले आमच्या अकॅडमी मध्ये उच्चशिक्षित सहा शिक्षकांचा सहभाग असून विद्यार्थ्यांना गणित, इंग्रजी, सायन्स आधीसारखे किचकट विषय साध्या आणि सोप्या पद्धतीने विद्यार्थ्यांकडून सोडवून घेतल्या जातात, त्यामुळे आमचा निकाल तालुक्यात सर्वात जास्त असल्याचेही त्यांनी भोकर न्यूज लाईव्हशी बोलताना सांगितले आहे. यावर्षीच्या निकालाबाबद तालुक्यातील अनेक पालकांनी समाधान व्यक्त केले आहे.