भोकर :(रमेश गंगासागरे ) मागील वर्षी उमरी येथे राहणाऱ्या एका अल्पवयीन मुलीवर तिघांनी बलात्कार केल्याप्रकरणी भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयाने दोघांना 20 वर्षे सजा व दंड ठोठावला आहे, तर एकाची सबळ पुराव्या अभावी निर्दोष मुक्तता केली आहे.
       
       याबाबत समजलेली थोडक्यात हकीकत अशी की, उमरी येथील व्यंकटेश नगर मध्ये राहणारी 15 वर्षांची अल्पवयीन मुलगी आपल्या आईसोबत घरात  झोपलेली असताना, रात्री अंदाजे 1 ते 3 च्या दरम्यान  तीन आरोपींनी येऊन तिच्या आईच्या गळ्याला चाकु लावुन अल्पवयीन मुलीवर पाशवी बलात्कार केला, याबाबद तिच्या आईने दिनांक  26 नोव्हेंबर 2018 रोजी उमरी पोलीस स्टेशन येथे रितसर फिर्याद दिल्यावरून आरोपी 1) आनंदा  सावंत 2) कुणाल उर्फ  खंडू गायकवाड आणि 3) शुभम देशमुख विरुद्ध उमरी पोलिसांनी गुन्हा दाखल केला, या गुन्ह्याचा तपास उपविभागीय पोलिस अधिकारी अभय देशपांडे आणि आय.पी.एस. अधिकारी शेख नूरुल हसन यांनी केला होता, सविस्तर तपासाअंती उमरी पोलिसांनी भोकर येथील जिल्हा व सत्र न्यायालयात दोषारोपपत्र सादर केले होते, त्या गुन्ह्याचा आज दिनांक 31 जुलै 2019 रोजी निकाल लागला असून आरोपींना या गुन्ह्यात दोषी धरून माननीय जिल्हा न्यायाधीश श्री शेख यांनी 20 वर्षाची शिक्षा व प्रत्येकी 8 हजार रुपये दंड ठोठावला आहे, तर तिसरा आरोपी नामे सुभम देशमुख यास सबळ पुराव्याअभावी निर्दोष सोडण्यात आले आहे, सदरील घटनेने उमरी तालुक्यात खळबळ माजली होती, या घटनेचा निकाल काय लागतो हे पाहण्यासाठी न्यायालय परिसरात गर्दी झाली होती सदरील बलात्कार प्रकरणाचा निकाल लागेपर्यंत तिन्ही आरोपी एका वर्षापासून कारागृहातच असल्याचे कळते, सरकारी पक्षातर्फे सदरील घटनेबाबत ऐकून 8 साक्षीदार तपासण्यात आले होते, सरकारी पक्षाची बाजू रमेश राजूरकर यांनी मांडली तर बचाव पक्षाची बाजू ॲडव्होकेट जेजे जाधव यांनी मांडली.