भोकर :-(रमेश गंगासागरे )  मागील तीन महिन्यापासून जिओ मोबाईलचे नेटवर्क ठीक ठाक रहात नसून ग्राहकांना उत्तम सेवा देण्यात ही कंपनी सपशेल अपयशी ठरल्याची चर्चा तालुक्यात होत आहे.

      जिओ कंपनी कडून प्रथम मोफत सेवेचे आमिष देऊन ग्राहकांना लुटण्यात आले, मेम्बर्शीप च्या नावाखाली पाचशे रुपयांना 1 सिम या प्रमाणे तालुक्यात हजारो नागरिकांकडून पैसे उकळण्यात आले, आता कमी पैशात अनलिमिटेड कॉलिंग, भरपूर  डाटा, देण्यासाठी पैसे उकळल्या जात आहेत, पण नेटवर्क अभावी ग्राहकांचा डाटा वापरल्या जात नाही, महत्वाच्या फाईल डाउनलोड होत नाहीत, सध्या विद्यार्थ्यांना सुट्या असल्याने मोबाईल वर ऑनलाईन खेळ खेळता येत नाहीत, बातम्या पाहता येत नाहीत, फेसबुक आणि व्हाट्सऍप चालत नाही अश्या तक्रारी वाढल्या आहेत, नेटवर्क नसल्याने परिणामी पैसे आणि डाटा वाया जात आहे, नेटवर्क अभावी ग्राहकांची महत्वाची कामे खोळंबली आहेत, त्यामुळे jio कंपनी ने तात्काळ नेटवर्क सुव्यवस्थित करून ग्राहकांची होणारी हेळसांड दूर करावी अशी मागणी जोर धरू लागली आहे.