भोकर :- (रमेश गंगासागरे ) भोकर येथील प्रतिष्ठित व्यापारी तथा भाजपचे निष्ठावंत कार्यकर्ते दिलीप सोनटक्के यांनी आयोजित केलेल्या रसाळी जेवणासाठी खासदार प्रताप पाटील चिखलीकर आणि प्रणिताताई पाटील देवरे यांच्यासह अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
आज दिनांक 14 जून रोजी दिलीप सोनटक्के यांच्या नवा मोंढा येथील राहत्या घरी दुपारी रसाळी जेवणासाठी भाजपचे तालुकाध्यक्ष गणपत पिठेवाड, जिल्हा परिषद सदस्य दिवाकर रेड्डी, नगरसेवक संतोष मारकवार, शेख अर्शद भाई ,गणेशराव पाटील कापसे बटाळकर, माधव शिंदे, बाबुराव दंडवे, गोविंद बाबा गौड पाटील, बालाजी वाघमारे, हरिभाऊ चटलावार, राजू करपे, माधव पाटील वडगावकर, सुनिल जाधव, यांच्यासह तालुक्यातून असंख्य मान्यवरांची उपस्थिती लाभली होती. चिखलीकर यांनी यावेळी भोकर शहरातील अनेक प्रतिष्ठित नागरिकांच्या भेटी घेतल्याचे कळते तसेच त्यांनी इतर सामान्य नागरिकांच्या अडीअडचणी सुद्धा जाणून घेतल्या असून त्यांनी दिलेल्या निवेदनांचा स्वीकारही केला.


0 Comments