भोकर :-(रमेश गंगासागरे ) येथील सुधा प्रकल्पची उंची वाढवणे आणि पिंपळढव येथील बंधाऱ्याचा प्रश्न सोडवण्यासाठी आजी-माजी खासदारात या दोन्ही तलावाचे श्रेय घेण्याबाबत जोरदार रस्सीखेच सुरू झाल्याचे चित्र भोकरमध्ये दिसून येत आहे.
विधानसभेची निवडणूक तोंडावर आली असतानाच भोकर मध्ये गेल्या चार दिवसापासून सुधा प्रकल्प आणि पिंपळढव येथील बंधाऱ्याचा पाणी प्रश्न सोडविण्याबाबत अनेक दैनिकांमधून तसेच शोषल मीडियावर आजी आणि माजी खासदारांनी प्रयत्न केल्याच्या बातम्या प्रकाशित झाल्याने याबाबत सामान्य जनता मात्र संभ्रमात पडली आहे, परवाच माजी खासदार श्री,अशोक चव्हाण हे पिंपळढव या गावास आपल्या निवडक सहकाऱ्यासह भेट देऊन पाहणी केल्याचे वृत्त तालुक्यात पसरले होते, त्यामुळे सामान्य नागरिकांना असे वाटले होते की, हा ज्वलंत पाणीप्रश्नचा विषय माजी खासदार अशोक चव्हाण यांनी सोडवला आहे, अशोक चव्हाण हे पिंपळढव आणि भोकरला येउन जाताच, दुसऱ्याच दिवशी या पाणीप्रश्नावर कायमचा पडदा टाकण्यासाठी नवनिर्वाचित खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर हे दिल्ली वरुन थेट भोकरला येऊन पिंपळढव आणि सुधा प्रकल्पाच्या पाणी प्रश्नाबाबत आज दि, 28 जून रोजी एक पत्रकार परिषद बोलावून सांगितले की,अशोक चव्हाण नाही तर आपणच स्वतः पाणी उपलब्धतेचे प्रमाणपत्र मिळवून आणल्याचे सांगितले आहे, ते पुढे म्हणाले की, मी सरकारमध्ये असून भोकर तालुक्यातील पाणी टंचाई दूर करण्यासाठी प्रयत्नशील आहे, असे ते म्हणाले, या पत्रकार परिषदेस भाजपाचे नागनाथ घिसेवाड, राजा खनडेराव, जी.प.सदस्य रेड्डी, सुभाष पाटील किन्हाळकर, किशोर पाटील लगळुदकर, तालुकाध्यक्ष गणपत पिटेवाड, संतोष मारकवार, दिलीप सोनटक्के, शेख अर्षदभाई, बालाजी वाघमारे, यांच्यासह अनेक कार्यकर्त्यांची उपस्थिती होती. आता या बंधाऱ्यावर नारळ फोडण्याचा योग कोणास लाभतो आणि या पाणीप्रश्नावर माजी खासदार श्री अशोक चव्हाण काय भूमिका घेतात, याकडे संबंध तालुक्याचे लक्ष लागले आहे.

0 Comments