भोकर :- (रमेश गंगासागरे ) झारखंड येथील तरबेज अन्सारी या मुस्लिम तरुणास काही समाजकंटकांनी रात्रभर झाडास बांधून निर्दयपणे मारहाण करून त्याचा खून केला या निषेधार्थ भोकर येथील जमाते उलेमा हिंद यांच्यावतीने उपविभागीय कार्यालय भोकर मूक मोर्चा काढून आरोपींना तात्काळ अटक करण्याची मागणी करण्यात आली.

       आज दिनांक 29 जून 2019 रोजी मूक मोर्चा द्वारे उपविभागीय अधिकारी भोकर यांना दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, देशात लाँचिंगच्या घटनेत दिवसेंदिवस वाढ होत आहे त्यावर वेळीच आवर नाही घातल्यास देशात अराजकता माजण्याची शक्यता नाकारता येत नाही, सदरील घटनेमुळे मुस्लिम समाजात दहशतीचे वातावरण निर्माण झाले असून मुस्लिम समाज भयभीत झाल्याचे दिलेल्या निवेदनात नमूद करण्यात आले आहे तसेच निवेदनात असेही म्हटले आहे की, तरबेज अन्सारी या तरुणाच्या हत्येस जबाबदार असणाऱ्या लोकांना तात्काळ अटक करून कठोरात कठोर कारवाई करण्यात यावी, तसेच तरबेज अन्सारीच्या कुटुंबीयास संरक्षण देऊन त्या कुटुंबास 50 लाख रुपयांची आर्थिक मदत त्वरित देण्यात यावी, तसेच तरबेज अन्सारीच्या कुटुंबातील एका व्यक्तीस शासकीय नोकरीत सामावून घेण्यात यावे, अशीही मागणी दिलेल्या निवेदनात करण्यात आली असून निवेदनावर जमात ए उलेमा हिंद चे तालुकाध्यक्ष मौलाना मोबिन खान यांची स्वाक्षरी आहे, सदरील मूक मोर्चा मुख्य रस्त्याने उपविभागीय अधिकारी कार्यालय येथे येऊन मोर्चाचे रूपांतर जाहीर सभेत करण्यात आले, यावेळी मोर्चाला संबोधित ॲडव्होकेट मुजाहिद, हाफिस उमर फारुख, मौलाना मोईन खान, हाफिस निजाम, जुनेद पटेल, मुफ़तीपूर खान आदींनी संबोधित केले. शेवटी उपविभागीय अधिकारी यांना मोर्चाच्या ठिकाणी निवेदन देण्यात आले. मोर्चात असंख्य मुस्लिम समाज बांधव सामील झाले होते.