भोकर :- (रमेश गंगासागरे )  उमरी तालुक्यातील एका आरोपीने एका अकरा वर्षीय अल्पवयीन मुलीस घरात बोलावून विनयभंग केल्याप्रकरणी भोकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश भोकर यांनी आज दिनांक 28 जून 2019 रोजी कलम 354 व पोस्को कलम 8 मध्ये दोषी धरून आरोपीस चार वर्षाची शिक्षा ठोठावली आहे.

         घटनेबाबत थोडक्यात माहिती अशी की, दिनांक 2 फेब्रुवारी 2018 रोजी संध्याकाळी साडेचार वाजण्याच्या सुमारास आरोपी नामे नारायण मल्लांना वाघे याने आपल्याच गावातील अकरा वर्षीय मुलगी किराणा दुकाना वरून खोबरे घेऊन घरी जात असताना तिला स्वतःच्या घरी बोलावून घेऊन मला थोडा कापूस विक्री करून दे असे म्हणून तिच्याकडे थोडा कापूस दिला ती विक्री करून पैसे देण्यासाठी परत घरी आल्यावर आरोपीने स्वतःच्या घरामध्ये कापसाच्या ढिगार्‍यावर उचलून ठेवले व तिचा विनयभंग केला, सदरील घटना मुलीने स्वताच्या घरी जाऊन आपल्या आजिबाईस सांगितल्यावरून उमरी पोलीस स्टेशन मध्ये गुन्हा रजिस्टर नंबर 26/ 2018 रोजी गुन्हा दाखल करून दोषारोपपत्र दाखल करण्यात आले होते, आरोपीविरोधात सबळ पुरावा मिळाल्यावरून भोकर येथील अतिरिक्त जिल्हा व सत्र न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी आज दिनांक 28 जून 2019 रोजी आरोपीस कलम354 व पोस्को कलम 8 मध्ये दोषी गृहीत धरून त्याला चार वर्षाची शिक्षा ठोठावण्यात आली आहे