भोकर : (रमेश गंगासागरे ) भोकर उमरी रस्त्यावर भोकर पासून जवळच असलेल्या श्रीकृष्ण मंदिरा लगत एक स्कूटी आणि ऑटोच्या झालेल्या भीषण अपघातात एका पोलिस कर्मचाऱ्याचा मृत्यू झाला आहे.

       घटनेबाबत समजलेली थोडक्यात माहिती अशी की, भोकर कडून लामकानी कडे जाणारी एक विना नंबरची स्कूटी आणि उमरी कडून भोकर कडे येणारा पिवळ्या रंगाचा मालवाहू ऑटो क्रमांक एम एच 26 AD 88 92 यांच्यात उमरी रोडवर, श्रीकृष्ण मंदिराजवळ दिनांक 26 जून रोजी रात्री दहा ते अकरा वाजण्याच्या सुमारास समोरासमोर भीषण धडक झाली, यात लामकानी येथील तरुण पोलिस कर्मचारी श्री, राजू गणेश सूर्यवंशी यांचा जागीच मृत्यू झाला. राजू सूर्यवंशी हे नांदेड पोलीस दलात क्यू आर टी मध्ये सामील असल्याचे समजते, अपघात झाल्याचे कळताच आजूबाजूच्या नागरिकांनी त्यांना वाचवण्यासाठी अपघातस्थळी धाव घेऊन ग्रामीण रुग्णालय भोकर येथे दाखल केले, पण त्यापूर्वीच त्यांचा मृत्यू झाल्याचे दिसून आले, अपघात एवढा भीषण होता की दोन्ही वाहनांचा चेंदामेंदा झालेला दिसून आले, तरुण पोलीस कर्मचाऱ्याच्या मृत्यूने परिसरात हळहळ व्यक्त केल्या जात आहे.