भगवान शेळके (हदगाव) / रमेश गंगासागरे (भोकर)
       भारतीय संविधानाच्या कलम 324 ते329 मध्ये निवडणूक आयोगाला स्वायत दर्जा दिला आहे सतराव्या लोकसभा निवडणुकीतील ईव्हीएम मशीनच्या मतमोजणीतील मतदान झालेल्या एकूण मतदाणापेक्षा कमी व जादा झाले त्यामुळे मतदान यंञावरील जनतेची दिशाभूल व लोकशाही निष्ठा उडाली आहे, अशी प्रतिक्रिया वंचित बहुजन आघाडीचे हदगाव ता. अध्यक्ष डॉ उत्तमराव शिंदे व भारिप बहुजन महासंघाचे अध्यक्ष राम नरवाडे दिली आहे.
         अलीकडच्या काळामध्ये विविध निवडणुकांमध्ये ईव्हीएमचा वापर सुरू झाला आहे परंतु देशभरातून ईव्हीएमच्या विरोधात   गदारोळ उठला आहे .परकीय देशांनी या ईव्हीएम मशीनला मान्य केले नाही .ईव्हीएम मधून मताची चोरी होत असल्याचे आरोप होत आहे . त्यामुळे लोकशाही धोक्यात आली आहे व जनतेचा निवडणूक प्रक्रियेवरचा विश्वास उडत आहे . लोकशाहीला मारक ठरत असलेली ईव्हीएम मशीन हटाव देश बचाव  लोकशाहीवर लोकांचा विश्वास कायम ठेवण्यासाठी व  येणारी विधानसभा निवडणूक ही  बॅलेट पेपरवर व्हावी म्हणून ईव्हीएम विरोधात भारिप बहुजन महासंघाचे राष्टीय अध्यक्ष अँड बाळासाहेब आंबेडकर यांच्या आदेशानुसार  १७ जून सोमवार रोजी सकाळी ११:३० ते दुपारी ३: ३० वाजता हदगाव तहसिल कार्यालय समोर झोपलेल्या शासन व प्रशासनला जागे करण्यासाठी तसेच लोकशाही संरक्षण करण्यासाठी ई , व्ही , एम , हटाओ देश बचाओ अंतर्गत घंटानाद जन आंदोलन करण्यात आले आहे त्यानंतर तहसीलदार यांना निवेदन सादर करण्यात आले  या वेळी उपस्थित भारिप बहुजन महासंघाचे हदगाव तालुका अध्यक्ष राम नरवाडे कामारीकर  , वंचित बहुजन आघाडीचे हदगाव तालुका अध्यक्ष डॉ .उत्तम शिंदे. डॉ बी. आर.औटे सामाजिक कार्यकर्ते ता. संघटक मुकिंदराव नरवाडे. संजय कांबळे सामाजिक कार्यकर्ते महासचिव गौतम वाठोरे . उपाध्यक्ष सुनील सोनाळे , भीमराव नरवाडे .विकास भालेराव .सम्राट नरवाडे दशरथ तीव्हाळे .  सल्लागार प्रकाश कांबळे ..मनोज हरणे .युवा अध्यक्ष अभिलाष किसनराव वाठोरे. नागोराव कदम. बानाजी वाढवेल शिवाजी खंदारे देवानंद पाईकराव दिलिप ढोले विकास भालेराव लोखंडे .हरडफ सर्कल अध्यक्ष डी .एन थोरात . मनोज कदम .विनोद भोरे , राजू हापसे . इत्यादी उपस्थित होते दुपारी अडीच वाजता सर्व कार्यकर्ते व नागरीकांच्या स्वाक्षरीचे निवेदनं मा. तहसीलदार यांच्या मार्फत निवडणूक आयोग, भारत सरकार यांना पाठवले आहे.
       तर भोकर येथे भारिपचे तालुकाध्यक्ष सुभाष तेले, उपाध्यक्ष दत्ता भाऊ डोंगरे सचिव सुनील भाऊ, पत्रकार हिरे, भीमराव दुधारे, दशरथ भदरगे यांच्या नेतृत्वाखाली तीव्र घंटानाद आंदोलन करण्यात येऊन दुपारी तहसीलदार भोकर यांना निवेदन सादर करण्यात आले आहे.