भोकर :- (रमेश गंगासागरे ) तालुक्यातील मौजे मातुळ येथील तरुण शेतकरी लक्ष्मण पुंडलीक पांचाळ वय २६ वर्ष, यांनी शेतात होणारी सततची नापिकी व बँकेचे वाढत चाललेले कर्ज कसे फेडावे ? या विवंचनेतून दिनांक २३ जून २०१९ रोजी सायंकाळी ५:३०ते ६ च्या दरम्यान स्वतःच्या शेतातील विद्युत तारेला स्पर्श करून आत्महत्या केली. नामदेव विठ्ठल पांचाळ यांनी दिलेल्या खबरीवरून भोकर पोलिसांमध्ये नोंद घेण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस हेडकॉन्स्टेबल एन.जी.अत्राम हे करीत आहेत.
गेल्या तीन-चार वर्षांपासून शेतात होणारी सततची नापिकी तसेच वाढत चाललेला डोक्यावरील कर्जाचा डोंगर व लांबलेला पाऊस यामुळे ते गेल्या काही दिवसांपासून चिंतेतच वावरत होते. शेवटी त्यांनी आत्महत्येसारखे टोकाचे पाऊल उचलून आपले जीवन संपविले. या घटनेमुळे गावात व परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त केल्या जात आहे. त्यांच्या पश्चात आई-वडील, भाऊ, पत्नी व एक वर्षाची मुलगी असा परिवार आहे. अचानक घरचा कर्ता जबाबदार तरुण मुलगा आत्महत्या केल्याने आई वडील व पत्नी पूर्णपणे हतबल झाले असून अख्खे कुटुंब उघड्यावर आले आहे. तेव्हा शासनाने त्वरित या कुटुंबाला आर्थिक मदत करून सावरावे तसेच त्यांच्यावर असलेल्या बँकेच्या कर्जाचा बोजा माफ करावा अशी मागणी ग्रामस्था तर्फे ही करण्यात आली आहे.

0 Comments