भोकर :-(रमेश गंगासागरे ) भोकर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी पंचायत समिती कार्यालय भोकर येथे दिनांक 20 जून 2019 रोजी दुपारी 1 वाजता तालुका विधी सेवा समिती भोकर, पंचायत समिती व तालुका कृषी कार्यालय भोकर यांच्या  संयुक्त विद्यमाने सदरील कार्यशाळेचे आयोजन करण्यात आले आहे, 

       या कार्यशाळेमध्ये शेतकऱ्याने कोणते बियाणे लागवडीसाठी खरेदी करावेत, त्यासाठी लागणाऱ्या खतांची निवड, पिकाची उगवण क्षमता तपासणे, कीटक नाशकांचा योग्य प्रमाणात वापर, फवारणीचे योग्य तंत्रज्ञान तसेच कोणत्या शेतकऱ्यांना शासनातर्फे सवलतीच्या दरात बी बियाणे मिळतात, याविषयीची संपूर्ण माहिती देण्यासाठी तालुका कृषी अधिकारी श्री गीते, श्री  बोईनवाड, डॉक्टर शिवाजी राचेवाड हे मार्गदर्शन करणार आहेत, तसेच मार्गदर्शनानंतर उपस्थित सर्व शेतकऱ्यांना एक झाड भेट म्हणून देण्यात येणार आहे, तरी या मार्गदर्शनाचा सर्व शेतकरी बांधवांनी लाभ घ्यावा असे आव्हान भोकर येथील तालुका विधी सेवा समितीचे अध्यक्ष तथा न्यायाधीश श्री मुजीब शेख यांनी केले आहे.