हदगाव :- (भगवान शेळके )  हिगोली लोकसभा मतदार संघात नुकतेच मतदान पार पडले आसुन त्या पार्श्वभुमिवर हदगाव हिमायतनगर या विधान सभेत झालेल्या वंचित बहुजन आघाडीला किती मतदान झाले आहे. या विषायावर आत्मचिंतन  करण्यासाठी वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष खरड पाटील यांच्या नेतृत्वाखाली शनिवारी शासकीय विश्राम ग्रह  तामसा येथे बैठक घेण्यात आली होती. या बैठकीतच अध्यक्षांची निवड करण्यात आली.
       
       वंचित बहुजन आघाडीच्या हदगाव तालुका अध्यक्षपदी डाॅ.शिंन्दे पाटील (उमरी जा.) यांची सर्वानुमते निवड करण्यात आली आहे. या बैठकीला वंचित बहुजन आघाडीचे जिल्हा अध्यक्ष बालाजी खरडे पाटील, वाकोडे साहेब, जिल्हा महासचिव प्रा.साहेबराव बेळे, भोकर ता.अध्यक्ष बाबुराव राठोड, आर्धापुर ता.अध्यक्ष प्रा.नवनाथ आव्हाड, किनवट ता.अध्यक्ष देविदास आमले, मुखेड ता.अध्यक्ष सुनिल कांबळे, नांदेड ता.युवाअध्यक्ष उत्तम धर्मेकर, विदर्भ प्रमुख श्रीपत ढोले, हदगावचे धडाडीचे नेतृत्व आसणारे प्रा.राजेशजी राऊत, हदगावचे बहुजन चळवळीचे कार्यकर्ते संजय कांबळे आष्टीकर, मुंकीद नरवाडे, प्रल्हाद जाधव, मारोतराव कांबळे, बबन कांबळे, किसन वाठोरे, भगवान भालेराव तिवाळे पत्रकार नारायण भुरेवार, हदगाव ता.प्रवक्ता सुनिल बाराटे, ता.उपाध्यक्ष सुनिल सोनांळे, रवि राठोड, सखारामजी खांडेकर, तर या कार्यक्रमाचे आयोजक बबन भालेराव, विठ्ठलराव हानवते, यांनी कार्यक्रम घडवुन आणले आहे.
      या कार्यक्रमात आनेकानी बोलताना म्हटले की, हदगाव तालुका हा पहीले पासुन अॅड.प्रकाशजी उर्फ बाळासाहेब आंबेडकर यांच्या विचाराला मानणारा वर्ग मोठ्या प्रमाणात आसुन मागिल २०१४ च्या हदगाव विधानसभा मतदार संघापेक्षा या वेळी हिगोली लोकसभा मतदार संघात हदगाव तालुक्यात वाढ झाली आसुन आता येणाऱ्या विधान सभेचा आमदार आपलाच आसला पाहीजे, त्या प्रकारची भुमिका कशी घेता येईल त्यातल्या त्यात वंचित बहुजन आघाडी बौध्द दलिताचा पक्ष नसुन सर्वजाती धर्माचे लोकनी या पक्षात काम करावे आशी भुमिका बाळासाहेब आंबेडकर यांची आहे. आसे या बैठकीत आनेक कार्यकर्ते बोलत होते. म्हणुन आता मराठा बांधव,ओ.बी.सी.,एस.टी,वर्गातील या बैठकीच्या कार्यक्रमाला बोलवण्यात आले होते. या कार्यक्रमात नव्यानेच हदगाव तालुका अध्यक्षपदी डाॅ.उत्तमराव शिंन्दे पाटील यांना हदगाव तालुक्याची जबाबदारी देण्यात आली आहे.