भोकर :- (रमेश गंगासागरे )  नांदेड लोकसभेचे नवनिर्वाचित खासदार श्री प्रताप पाटील चिखलीकर हे निवडून आल्यानंतर आज दि, 2 जून रोजी प्रथमच भोकर शहरात दाखल होत असून ते प्रथम पाळज येथील गणपतीचे दर्शन घेतील, त्यानंतर दुपारी भोकर शहरात पाणीपुरवठ्याबाबत अडीअडचणी जाणून घेण्यासाठी शासकीय विश्रामगृह येथे आढावा बैठक घेणार असल्याची माहिती आहे.
       त्यांच्यासोबत भोकर व भोकर तालुक्यातील भाजपचे सर्व पदाधिकारी उपस्थित राहणार असून पंचायत समिती, जिल्हा परिषद सदस्य व नगरसेवक हे देखील खासदार चिखलीकर यांच्या सोबत पाळज येथील गणपतीचे दर्शन घेऊन भोकर येथील आढावा बैठकीला हजर राहणार असल्याचे कळते. चिखलीकर यांच्या प्रथमच भोकर येथील भेटीने कार्यकर्त्यात नवचैतन्य निर्माण झाले असून लवकरच चिखलीकर यांचा भोकर शहरात नागरी सत्कार करण्यात येणार असल्याची माहिती मिळाली आहे.